Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Beauty Tips : नितळ त्वचेची काळजी कशी घ्यावी ...

Beauty Tips : नितळ त्वचेची काळजी कशी घ्यावी ...
, मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (22:50 IST)
तुम्हाला त्वचेची कशी काळजी घ्यायची याची माहिती आहे? नसल्यास माहिती करुन घ्या; कारण बदलल्या हवामानानुसार तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर तुमची नितळ त्वचा खराब होऊ शकते आणि याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागू शकतात.. पण, ही काळजी घ्यायची कशी? चला तर मग जाणून घेऊयात...
आपल्यातील अनेकांची त्वचा खूपच संवेदनशिल असते. पण, आपल्याला त्याची माहिती नसते. त्वचेची काळजी म्हणून आपण अनेक उपाय करतही असतो पण, कळत-नकळतपणे याचे दुष्परिणामही होत असतात आणि त्याकडे आपले दुर्लक्ष होते.  जर तुमच्या त्वचेवर लाल डाग पडत असतील, खाज सुटत असेल आणि दुखत असेल तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. यातील एकही समस्या तुम्हाला सतावत असेल तर तुम्हाला उपचाराची गरज आहे. त्वचा संवेदनशिल असणे हा कोणताही आजार नाही किंवा आजाराचे लक्षणही नाही पण, यामुळे अनेक त्वचाविकार होऊ शकतात, याकडे कानाडोळा करुन चालणार नाही. अशा लोकांना त्वचाविकार आणि अ‍ॅलर्जी होऊ शकते. अशी लक्षणे आढळल्यास तुम्ही घरगुती उपाय करण्यापेक्षा त्वरित त्वचारोगतज्ञांचा सल्ला आणि गरज पडल्यास उपचार घेण्याची गरज आहे.
 
संवेदनशिल त्वचा असणार्‍या लोकांना काही उत्पादनांचीही अ‍ॅलर्जी असू शकते.
एखाद्या क्रीमचा वापर केल्यावर रॅश येणे, जळजळणे, उन्हात गेल्यावर त्वचा ओढल्यासारखी होणे, चेहरा लालबुंंद पडणे अशी अनेक लक्षणे दिसून येतात.
अर्थात प्रत्येकालाच ते लागू होत नाही कारण प्रत्येकाचे बाबतीत ही लक्षणे वेगवेगळी असू शकतात. काही अ‍ॅलर्जी या अनुवांशिकही असू शकतात.
खाण्यामधूनही काळजी न घेतल्यास त्याचे त्वचेवर परिणाम झालेला दिसून येतो कारण, अनेकांना खाण्या-पिण्यातूनही अ‍ॅलर्जी असू शकते. कॉफी अथवा तत्सम पेय, अगदी गरम पदार्थ खाल्यामुळेही त्वचाविकार होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
 
काय काळजी घ्याल..
बदलत्या हवामानानुसार त्वचेची काळजी घ्या
चेहरा अधूनमधून चांगल्या पाण्याने धुवा
शक्य झाल्यास कोमट पाण्याचा वापर करा
शक्यतो उन्हात जाण्याचे टाळा
उघडी असणारी त्वचा झाकण्याचा प्रयत्न करा
अ‍ॅलर्जी होणारी उत्पादने वापरु नका
घरगुती उपाय शक्यतो करु नका
त्वचाविकार होणारे पदार्थ खाण्याचे टाळा
त्वचाविकार झाल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Reduce Obesity भरपूर खा या 5 वस्तू, नाही वाढणार वजन