Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

How to use conditioner कंडिशनरचा वापर कसा करावा

conditioner
, मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (15:21 IST)
How to use conditioner केसांचे सेटिंग करण्यापूर्वी कंडिशनिंग करून घ्यावे. केस अधिक चांगले सेट करता येतात. कंडिशनर केवळ केसांना लावावा. शक्यतोवर टाळूला कंडिशनर लावू नये
कंडिशनिंग करण्यापूर्वी केस व्यवस्थित धुऊन घ्यावेत, म्हणजे केसांवरील डिटर्जंट पूर्णपणे निघून जाईल. 
कंडिशनर वापरण्यापूर्वी केसांमधील जास्तीचे पाणी कमी करून घ्यावे व मगच केसांना कंडिशनर चोळून लावावा. साधारणपणे पाच मिनिटांनंतर कंडिशनर पूर्णपणे धुऊन घ्यावा. 
केस अगदीच खराब झालेले असल्यास, आणि डीप कंडिशनिंगची आवश्यकता असल्यास कंडिशनरचे प्रमाण थोडे अधिक घ्यावे व थोडा अधिक वेळ कंडिशनवर लावून ठेवावा. 
घरच्याघरी कंडिशनर करायचा असल्यास अंडे, मेंदी, मेथी किंवा जास्वंदाच्या पानांचा वापर करता येईल. 
कंडिशनरच्या वापरामुळे केसांवर एक संरक्षक आवरण निर्माण होते. याच्यासाठी कंडिशनिंग करण्यापूर्वी शँपू वापरून केस स्वच्छ करून घ्यावेत आणि नंतरच कंडिशनिंग करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hair Serum नारळाचं तेल आणि कोरफडीने या प्रकारे तया करा हेअर सीरम