Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

काजळ विकत घेतांना या गोष्टी लक्षात ठेवा

Care to be taken while buying Soot
, गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (07:30 IST)
रोजच्या जीवनात सर्व महिला थोडाफार तरी मेकअप करतात. मेकअप मध्ये आय लुकची भुमिका सर्वात महत्वाची असते रोज मेकअप करतांना डोळ्यात काजळ लावणे सर्वांना आवडते. तसेच थंडीमध्ये डोळ्यांमध्ये काजळ लावणे टाळले जाते. पण जर तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही डोळ्यात काजळ लावू शकतात. काजळ विकत घेतांना लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येक ऋतुमध्ये काजळ लावून तुमच्या लुकला आकर्षित करू शकतात. 
 
काजळ पेंसिलमध्ये केमिकल-
तुम्हाला मार्केटमध्ये अनेक प्रकारचे काजळाचे मोठे-मोठे ब्रांड्स लागलीच मिळतील. अशात तुम्ही डोळ्यांना आकर्षित बनवण्यासाठी एखादया चांगल्या कंपनीचे काजळ निवडणे. कारण लोकल आणि केमिकल असलेले प्रोडक्ट तुमच्या डोळ्यांना फक्त ड्राय करणार नाही तर तुमच्या डोळ्यांचे नुकसान पण करतील.  
 
काजळमध्ये ऑइल- 
पेंसिल काजळाचा उपयोग केल्याने ती डोळ्यातील कोरडेपणा वाढवते. पण जर पेंसिल काजळमध्ये ऑइल असेल तर तुमच्या डोळ्यांना कुठल्याच प्रकारचे नुकसान होणार नाही. म्हणून प्रयत्न करा की नैसर्गिक प्रोडक्ट घ्याल कारण यामुळे तुमच्या डोळ्यांना पोषण पण मिळेल. 
 
या गोष्टी लक्षात ठेवा- 
डोळ्यांचा मेकअप करतांना हातांच्या दबावाचा कमीत कमी उपयोग करा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना कुठल्याच प्रकारचे नुकसान होणार नाही. डोळ्यांचा मेकअप करतांना ब्लेंडिंग वर विशेष लक्ष देणे. ज्यामुळे तुमचा लुक आकर्षित दिसेल. जर तुमचे डोळे नाजुक सेंसेटिव असतील तर वॉटरलाइन पासून थोडया अंतरावर काजळाचा उपयोग करणे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खसखसचा हलवा खाण्याचे सात फायदे