Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्वचेसंबंधित समस्या दूर करते हे तेल, जाणून घ्या याचे फायदे

jasmine chameli
, शनिवार, 13 जुलै 2024 (15:42 IST)
Jasmine Oil Benefits: चमेली एक सुगंधित तेल आहे. तसेच हे तेल केसांसंबंधित आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. चला जाणून घेऊ या चमेलीच्या फुलांचे फायदे कोणते....
 
Jasmine Oil Benefits:  चमेलीच्या फुलांमध्ये अनेक गुण असतात. तसेच हे एक प्रकारे मेडिसिनल प्लांट आहे. व चमेली एक प्रकारे जडी बुटी देखील आहे. आयुर्वेदमध्ये चमेलीच्या चमत्कारीक फायदयांबद्दल सांगितले आहे. चमेली ने ताप, दुखणे, जखम इत्यादींवर उपचार केले जाऊ शकतात. चमेली पासून बनलेली औषध कॅन्सर आणि लिवरवरील ऊपचारासाठी वापरले जातात. चमेलीचे तेल, औषध, अत्तर देखील बनवले जातात.  
 
तसेच चमेलीचा उपयोग एरोमाथेरेपी मध्ये देखील केला जातो. ही थेरेपी डिप्रेशनला बरी करते. चमेलीचे फूल एरोमाथेरेपीसाठी प्रसिद्ध आहे. चमेलीच्या फुलांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये ग्लाइकोसाइड, फेनोलिक कंपाउंड, फ्लेवोनॉयड, टैनिन्स, कार्बोहाइड्रेट सैपोनिंस सारखे पोषकतत्व असतात. यांचा उपयोग केसांची सुंदरता आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो.
 
केसांना मुलायम करते-
चमेलीच्या तेलाने तुम्ही केसांवर मसाज करू शकतात. हे तेल केसांचा रुक्षपणा दूर करण्यासाठी मदत करते. या मध्ये असलेले मॉइश्चराइजर तुमचे केस मुलायम ठेवण्यास मदत करतात.
 
त्वचाला इंफेक्शन पासून दूर ठेवते-
मॉनसूनमध्ये अनेक लोकांना त्वचेचे इंफेक्शन होते. अशावेळेस चमेलीच्या तेलाचा उपयोग करावा. चमेलीच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ई देखील असते. यामध्ये अँटी-इंफ्लामेट्री आणि अँटीसेप्टिक गुण असतात. हे त्वचेवरील मुरूम दूर करण्यासाठी मदत करतात.
 
रुक्ष त्वचा- 
रुक्ष त्वचासाठी चमेलीचे तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो. हे त्वचेला ओलावा देण्यास मदत करते. व त्वचा हाइड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते.  रात्री झोपण्यापूर्वी चमेलीच्या तेलाचा उपयोग करावा. 
 
स्‍ट्रेच मार्क्‍स दूर करते- 
प्रेगनेंसी दरम्यान स्‍ट्रेच मार्क्‍सची समस्या निर्माण होते. स्‍ट्रेच मार्क्‍सला दूर करण्यासाठी तुम्ही चमेलीच्या तेलाच्या उपयोग करु शकतात, हे निशाण दूर करण्यासाठी मदत करतात. 
 
केस गळती समस्या-
चमेलीच्या तेलामध्ये अँटीबैक्टीरियल गुण असतात. हे स्‍कैल्‍पला बॅक्टीरिअल इंफेक्‍शन कमी करण्यासाठी मदत करतात. चमेलीच्या तेलाचा उपयोग आठवड्यातून दोन वेळेस करावा. या तेलाने डोक्याचा मसाज करावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केवळ लाइफस्टाइलमध्ये बदल करून आपण मेंदूचं वय कमी करू शकतो का?