Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Make up Tips हे मेकअप प्रॉडक्ट्स रोज वापरू नये

Make up Tips हे मेकअप प्रॉडक्ट्स रोज वापरू नये
, सोमवार, 24 जुलै 2023 (20:05 IST)
मेकअप ही प्रत्येक स्त्रीची आवड असते. त्यातून आवडतं ब्रँड, कलर, आणि परर्फेक्ट मेकअप किट हाती लागून गेली तर दररोज मेकअप करण्याची सवयच पडू लागते. मग चेहरा, डोळे, केस त्या प्रॉडक्ट्सविना बघायला आवडत नाही मग याने नैसर्गिकपणे त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होऊ लागतो.
 
काही मेकअप प्रॉडक्ट्स असे असतात जे दररोज वापरू नये. तर बघून घ्या असे कोणते प्रॉडक्ट्स आहे जे वापरल्याने आपल्या त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो:
 
ड्राय शांपू
केस धुवायला वेळ नसल्यास लोकं ड्राय शांपू वापरतात. परंतू याच्या अतिवापरामुळे केस रुक्ष आणि कमजोर होऊ लागतात. केस तुटू लागतात आणि त्यांची गुणवत्ताही घटते.
 
डिप कंडिशनर
डिप कंडिशनर दिल्यावर केस सुंदर दिसतात परंतू याचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतं आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं. हा प्रॉडक्ट दररोज वापरणे योग्य नाही.
 
मेडिकेटेड लिप बाम
फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरलं जातं. पण निरंतर हे वापरल्याने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते.
 
मेकअप प्रायमर
मेकअप करण्यार्‍यांना हा प्रॉडक्ट वापरणे अत्यंत आवडतो कारण याने त्वचेवरील सर्व डाग लपून जातात. जर आपल्या प्रायमरमध्ये सिलिकॉन आहे आपण हे रोज वापरत असाल तर याने त्वचेवरील छिद्र बंद होऊ शकतात. ज्यामुळे त्वचा खरखरीत आणि वाईट दिसू लागते.
 
वॉटरप्रूफ मस्करा
मस्करा लावल्याने डोळे मोठे आणि आकर्षक दिसतात. परंतू दररोज वाटरप्रूफ मस्करा वापरल्याने लॅशेज वाळू लागतात. म्हणून हे दररोज वापरणे टाळावे.
 
सेल्फ टॅनर
अनेक लोकं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचावासाठी दररोज सेल्फ टॅनर वापरतात. पण दर रोज हे वापरल्याने फायदा कमी नुकसान अधिक होण्याची शक्यता असते. हे प्रॉडक्ट वापरणे टाळावे कारण याने त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mind if going to the Gym जिम जात असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा