मेकअप : या पावसाळी दिवसात मेकअप करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण तुम्ही पावसात थोडेही भिजलात तरी तुमचा मेकअप खराब होतो त्यासाठी फाउंडेशनच्या जागेवर फेस पावडरचा वापर करावा.
डोळ्यांसाठी प्रयोगात येणारे लायनर किंवा मस्करा वॉटरप्रूफ असावा. असा मेकअप पावसात खराब होणार नाही.
केस : या मोसमाचा आनंद घेताना केसांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात केसांवर जेल वापरू नये. कारण या काळात डँड्रफ किंवा उवा होण्याची शक्यता जास्त असते. कोमट तेलाची मालीश करावी व केसांना दीर्घकाळ बांधून ठेवावी.