पावसाळ्याचा हंगाम सर्वानाच आवडतो. पावसाळयात गरम पकोडे आणि चहाची मजाच काही और असते.परंतु पावसाळ्यात त्वचेचे स्वरूप बिघडते. उन्हाळ्यात आणि थंडीत त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. काहींची त्वचा खूप तेलकट असते.तर काहींची त्वचा कोरडी असते.परंतु पावसाळ्यात त्वचा चिकट होते. या हंगामात त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे.कारण त्वचेची काळजी न घेतल्याने मुरूम, पुळ्या, पुटकुळ्या होतात.तर या हंगामात त्वचेची काळजी कशी घ्यावी जेणे करून त्वचेची चमक तशीच राहील .वेबदुनियाने सौंदर्य तज्ज्ञ रवीश दीक्षित यांच्याशी चर्चा केली चला जाणून घेऊ या त्यांनी काय सांगितले ते.
* क्लिन्झरने वेळोवेळी चेहरा स्वच्छ करा. जेणे करून छिद्र बंद होणार नाही.
* पावसाळ्यात ओलाव्यामुळे संसर्ग होण्याचा धोका होऊ शकतो म्हणून अँटी बेक्टेरिअल टोनर चा वापर करावा. ज्यांना आद्रतेमुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा पुटकुळ्या येतात ते देखील होणार नाही.या मुळे आपल्या त्वचेची पीएच पातळी राखली जाईल.
* एखाद्याची त्वचा अधिक कोरडी असते परंतु पावसाळ्यात असं होतं नाही.चिकटपणा जाणवतो.कोरड्या त्वचेसाठी आपण एखादी मॉइश्चरायझर क्रीम वापरू शकता.त्वचेला हायड्रेट करण्यासाठी काही उत्पाद येतात ते वापरू शकता.जेणे करून त्वचा मऊ राहील.आपण ऑइल बेस्ड उत्पादक वापरू शकता.
* एखाद्याची त्वचा खूप तेलकट असते, म्हणून मॉइश्चरायझर चा वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर जास्त प्रमाणात तेल येईल. आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी जेल बेस्ड उत्पादनांचा वापर करा. जेणेकरून त्वचा तेलाचे संतुलन करू शकेल.
* बऱ्याच वेळा पावसाळ्यानंतर ऊन येत ते खूपच तीक्ष्ण असतं .त्या वेळी घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लावूनच निघा.या मुळे टॅनिग होणार नाही.