Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिव्ह ऑइल चे फायदे जाणून घ्या

ऑलिव्ह ऑइल चे फायदे जाणून घ्या
, गुरूवार, 17 जून 2021 (08:30 IST)
ऑलिव्ह तेल हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.नियमितपणे शरीरावर याचे सेवन केल्याने फायदे मिळतात.ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स, खनिज आणि अँटी  ऑक्सिडेंट्ससह बरेच पौष्टिक पदार्थ असतात. हे तेल शरीरावर लावले जाते आणि सेवन देखील केले जाते. याच्या सेवनाने कर्करोगासारख्या रोगांमध्ये आराम मिळतो.मधुमेहासाठी हे फायदेशीर आहे. 
चला याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या.
 
1 स्मरण शक्ती  वाढवते-या तेलात पॉलिफेनॉल घटक आढळतं याच्या सेवनाने स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो.
 
2 कर्क रोगा पासून आराम- कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे.याचे सेवन केल्याने कर्करोगाशी संबंधित आजार कमी केले जाऊ शकतात.या मध्ये व्हिटॅमिन डी,व्हिटॅमिन ई,व्हिटॅमिन ए आणि बी -केरोटीन प्रामुख्याने आढळतात.
 
3 त्वचेला चमकदार बनवते-निर्जीव त्वचेला चमकदार करण्यासाठी दररोज ऑलिव्ह तेलाने मालिश करा. एका आठवड्यानंतर आपण कोरड्या त्वचेपासून मुक्त व्हाल.
 
4 वेदनेपासून आराम मिळतो- हाडांमध्ये सतत वेदना होतं असल्यास आपण ऑलिव्ह तेलाची मॉलिश करू शकता.या मधील घटक आपल्याला या वेदनेपासून आराम देतात तसेच ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असल्यास देखील आराम मिळेल.
 
5 केसांना बळकट करत-ऑलिव्ह ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई असतं.हे केसांसाठी महत्त्वाचे घटक आहे.या मुळे केस बळकट होतात ऑलिव्ह तेल हे कंडिशनर म्हणून काम करत. आपण तेल लावून गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता.या मुळे केस चमकदार आणि मजबूत होतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डास चावल्यावर खाज का येते ? जाणून घ्या