Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

webdunia
, गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (18:34 IST)
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या  प्रकारच्या आणि रंगाच्या नेलपेंटस्‌ बाजारात मिळतात की कोणता रंग आपण लावावा असा प्रश्र्न हमखास अनेकांना पडतो. पण तरीही कितीही पेचात असलो तरी शेवटी आपण आपल्या आवडीचा रंग निवडत असतो. तुमच्या नेलपेंटचा रंग तुमची पर्सनॅलिटी दर्शवत असतो. जाणून घेऊया नेमका तुमच्या आवडीचा नेलपेंटचा रंग तुमच्या पर्सनॅलिटीविषयी काय सांगतो ते...
 
गोल्डन/ सिल्व्हर रंग
काहींना ग्लिटरी रंग लावाला आवडतात. असे रंग लावणार्‍या व्यक्ती कायमच आकर्षित करणार असतात. त्यांना कायम लोकांनी आपल्याकडे पाहात राहावे असे वाटते. त्यांचे व्यक्तिमत्व तसे असल्यामुळे तसे होतेसुद्धा म्हणा. गोल्डन, सिल्व्हरचे शेड लावणारे लोक म्हणूनच थोडे खास असतात.
 
लाल रंग
काहींना लाल रंगाच्या शेड्‌स इतक्या आवडतात की, तुम्हाला कायम त्यांच्या बोटांना लाल रंगाचीच नेलपेंट दिसून येते. लाल रंगामुळे तुमची बोटं अगदी चार चौघात उठून दिसतात. असे व्यक्ती फार सेक्सी, धाडसी असतात. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. 
 
काळा रंग
हल्ली खूप जण काळ्या रंगाची नेलपेंट लावताना दिसतात. काळा रंग हा ट्रेंडमध्ये असला तरी त्यातून तुमचे व्यकितमत्व प्रतिबिंबित होते. काळ्या रंगाची नेलपेंट लावणारे लोक कलात्मक असतात. म्हणजे
त्यांना कला क्षेत्राची आवड अधिक असते. फॅशन, संगीत अशा क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतात. काळा रंग जरी त्यांची पर्सनॅलिटी खुलवत असेल तरी अशी लोक मनाने फारच हळवी असतात.
 
गुलाबी रंग
आता महिलांना सर्वसाधारणपणे नेलपेंटसाठी आवडणारा रंग म्हणजे गुलाबी. आता या गुलाबी रंगातही बरेच शेड्‌स आहेत. म्हणजे तुम्ही हॉट पिंक हा शेड लावत असाल तर तुम्ही बोल्ड विचारांचे असता. त्यांच्यातील सद्‌सद्‌विवेकबुद्धी चांगली असते. तर फिकट गुलाबी रंग लावणारे हळव्या मनाचे असतात. त्यांना इतरांची काळजी घ्यायला खूप आवडते. अशा व्यक्तींना इतरांची काळजी फार असते.
 
निळा रंग
हल्ली निळा रंगाच्या नेलपेंट्‌स लावायला अनेकांना आवडते. निळा रंग शांतता आणि सामंजस्याचे प्रतीक असते. अशा व्यक्ती शांत आणि समजूतदार असतात. त्यांना त्याच्या नियमानुसार वागायलाच आवडते. त्यामुळे कोणताही अन्य मार्ग स्वीकारायला तयार नसतात.
 
निऑन रंग
थोडेसे भडक असे निऑन रंग असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची शेड असते. नवीन आयडियाज आणि नवीन आव्हानांसाठी ही लोक तयार असतात. या लोकांमध्ये कमालीची ऊर्जा असते. यांना नेहमी नव्या  कल्पना सुचतात.
 
न्यूड रंग
नखांचा रंगाला जाईल असे रंग म्हणजे न्यूड रंग खूप जणांना आवडतात. अशा व्यक्ती फार स्थिर असतात. त्यांना त्यांच्या तत्त्वांना चिकटून राहायला आवडते. त्यांना त्यांचा क्लास मेंटेन करायला
आवडते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दाद ... खाज... खुजली....