Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनबर्न टाळण्यासाठी 5 उपाय करा

सनबर्न टाळण्यासाठी 5 उपाय करा
, गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (22:32 IST)
उन्हात सनबर्न होणं ही सामान्य समस्या आहे. उन्हाळ्यात सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण करणे थोडे अवघड आहे. सनबर्न पासून त्वचेचा बचाव करण्यासाठी काही जबरदस्त टिप्स वापरू शकता.चला तर मग जाणून घेऊ या काय आहे या टिप्स.
 
1 गुलाब पाण्यात कलिंगडाचे रस मिसळा, हे 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आपण दररोज हे आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. या मुळे सनबर्नचा प्रभाव नाहीसा होईल. 
 
2 एक चमचा मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा हे 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा धुऊन घ्या दररोज हे लावावे.
 
3 काकडी किसून दह्यात मिसळून लावा. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. असं केल्याने सनबर्नचा प्रभाव कमी होतो. 
 
4 सनबर्न चा प्रभाव त्वचेवर कमी करण्यासाठी कापसाच्या मदतीने थंड दूध देखील चेहऱ्यावर लावू शकता. असं नियमितपणे केल्याने त्वचेचा रंग उजळेल.
 
5 मूठभर तीळ वाटून अर्धा कप पाण्यात मिसळून  2 तास तसेच राहू द्या. हे पाणी गाळून चेहरा स्वच्छ करा या मुळे सनबर्न मध्ये फायदा होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालकाचे पौष्टिक सूप