Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lighten Dark lips या वाईट सवयींमुळे तुमचे ओठ काळे होऊ शकतात, अशी घ्या काळजी

lips care tips
, गुरूवार, 21 जुलै 2022 (08:11 IST)
सुंदर आणि आकर्षक ओठ कोणाला नको असतात? विशेषतः महिलांना त्यांचे ओठ गुलाबी, सुंदर आणि आकर्षक दिसावेत अशी इच्छा असते. पण काहीवेळा काही सवयींमुळे ओठ काळे तर होतातच पण ते खूप कोरडेही दिसतात. या काळ्या ओठांमुळे अनेकवेळा लोकांना लाज वाटू लागते. अशा परिस्थितीत, जर तुमचे ओठ देखील काळे आहेत आणि तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या काही सवयी सोडाव्या लागतील. आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे ओठ सुंदर आणि आकर्षक राहतात.
 
मृत त्वचा - आपल्या ओठांवर मृत त्वचेच्या पेशींचा एक थर जमा होतो, ज्याला काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. मृत त्वचेमुळे ओठांवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे ओठांची त्वचा खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत, दररोज ओठांना मालिश करणे आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकणे आवश्यक आहे.
 
लिपस्टिक - लिपस्टिकच्या वापरानेही ओठ काळे पडतात. लिपस्टिकमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो, त्यामुळे ओठ काळे होऊ लागतात, विशेषत: निकृष्ट दर्जाची लिपस्टिक वापरल्यास या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केवळ चांगल्या दर्जाची लिपस्टिक वापरणे महत्त्वाचे आहे.
 
धूम्रपान- धुम्रपानामुळेही ओठ काळे पडतात. त्यामुळे तुम्हीही धूम्रपान करत असाल तर ही वाईट सवय आजच सोडा. असे केल्याने तुम्ही तुमच्या ओठांना काळे होण्यापासून वाचवू शकता.
 
कमी पाणी पिणे- शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठांचा रंग बदलतो. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हिवाळ्यात याची विशेष काळजी घ्या आणि किमान 8 ग्लास पाणी प्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Cholesterol Control: हे ज्यूस प्यायल्याने कोलेस्ट्रॉल राहते नियंत्रणात, मधुमेहातही फायदा होईल