हेअर मसाजसाठी टिप्स स्काल्प व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही नेहमी हेअर मसाज आपल्या बोटांनी करावा
तुम्ही केसांना नीट मसाज केल्यास, तुमच्या रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होते
नेहमी तुमच्या केसांना मसाज करताना तुम्ही कानांपासून सुरूवात करा. त्यानंतर मध्यभागी मसाज करा आणि मग पुन्हा अशीच प्रक्रिया तुम्ही करा. या पद्धतीला ओरिएंटल मसाज पद्धत असंही म्हणतात
तसंच तुम्ही सर्क्युलर मोशनमध्येही मसाज करू शकता. ज्यमुळे तुमचं डोकं आणि मानदेखील रिलॅक्स राहते. या केसाच्या मसाजमुळे तुमच्या शरीराला योग्य थंडावा मिळतो आणि रिलॅक्सेशनही मिळतं.
तुमचा मसाज जास्तीत जास्त नीट होण्यासाठी तुम्ही नेहमी बोटांनी मसाज करत सर्क्युलर मसाज करावा.