Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भगवान शिव-पार्वती यांच्या आनंदी वैवाहिक जीवनातील 10 गोष्टी

भगवान शिव-पार्वती यांच्या आनंदी वैवाहिक जीवनातील 10 गोष्टी
, मंगळवार, 21 जुलै 2020 (02:26 IST)
आदर्श वैवाहिक जीवन याबद्दल बोलायचे तर महादेव आणि श्रीराम यांची उत्कृष्ट उदाहरणे दिली जातात. भगवान शंकर आणि पार्वतीच्या मधील सारं जीवन मानवी समाजाला प्रेरणा देतं राहील. या साठी की वैवाहिक जीवन असायला हवं तर ते शिव-पार्वती सम. चला जाणून घेऊया आनंदी वैवाहिक जीवनाबद्दलच्या 10 खास गोष्टी-
 
1 एकमेकांवर प्रेम करा : राजा दक्ष यांच्या मुलीला दक्षा किंवा दाक्षणीला कैलासावर राहणाऱ्या वैरागी शिव यांच्याशी प्रेम झालं तर त्यांनी लग्न केले पण तिच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. तिच्या वडिलांनी एकदा त्यांचा पतीचे अपमान केले तर ती आपला पतीचा झालेला अपमान सहन करू शकली नाही आणि आपल्या वडिलांच्याच यज्ञकुंडात उडी मारून स्वतःला भस्मसात केलं. हे ऐकून भगवान शिव खूप दुःखी आणि क्रोधित झाले आणि त्यांनी वीरभद्राला पाठवून राजा दक्षांकडे नासधूस करविली. वीरभद्राने राजा दक्षाची मान कापून शिवाच्या समोर ठेवली. शिवाचा राग नंतर दुःखात बदलला ते आपल्या बायकोचा प्रेताला घेऊन साऱ्या जगात हिंडत होते. ज्या-ज्या स्थळी आई सतीचे अवयव किंवा दागिने पडले त्या-त्या स्थळी शक्तिपीठे स्थापित झाली. या नंतर शिव अनंत काळासाठी समाधिस्थ झाले. 
 
2 विधिवत लग्न : भगवान शिव आणि आई पार्वतीचे एकमेकांवर प्रेम होते पण त्यांनी कधीही गंधर्व विवाह किंवा अन्य कोणत्याही प्रकाराचे लग्न केले नसे. त्यांनी समाजात चाललेले वैदिक पद्धतीनेच लग्न केले होते. प्रथमच त्यांचे लग्न आई सतीशी ब्राह्मणी विधिवत लावून दिले होते आणि दुसऱ्यावेळी आई सतीच्या पार्वतीच्या रूपात दुसरे लग्न देखील सर्वांच्या संमतीने विधिवत झाले होते. एक आदर्श वैवाहिक जीवनात सामाजिक प्रथा आणि परिवाराची संमती देखील आवश्यक असते.
 
3 जन्मो-जन्माचा साथ : आई सतीने जेव्हा दुसरे जन्म हिमवान यांच्याकडे पार्वतीच्या रूपात घेतले तेव्हा तिने शिवाच्या प्राप्तीसाठी कठीण तपश्चर्या आणि उपवास केले. या वेळी तारकासुराची दहशत होती. त्याचा संहार शिवाचा मुलगाच करेल असं त्याला वरदान होतं. पण शिव तर तपश्चर्येमध्ये लीन होते. अशावेळी देवांनी शिवाचे लग्न पार्वतीसह करण्याची योजना आखली. त्यासाठी कामदेवांना त्यांची तपश्चर्या खंड करण्यासाठी पाठविले. कामदेवाने तपश्चर्या खंडित तर केली पण स्वतः भस्मसात झाले. नंतर शिवने पार्वतीसह लग्न केले. या लग्नात शिव वरात घेऊन पार्वतीकडे गेले. या कथेचे वर्णन पुराणांमध्ये आढळतं. शिवांना विश्वास असे की सती पार्वतीच्या रूपात परत येईल तर पार्वतीने देखील शिवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्याच्या रूपात समर्पणाचे एक उत्तम उदाहरण दिले आहे.
 
4 एक पत्नी व्रत : भगवान शिव आणि पार्वतीने एकमेकांशिवाय दुसऱ्या कोणालाही आपले जीवन संगिनी बनवलं नाही. शिवाच्या पहिल्या बायको सतीनेच पार्वतीच्या रूपात जन्म घेतले आणि त्यांनाच उमा, उर्मी, काळी म्हणतात. गोष्ट मग जगाच्या निर्मिती असो किंवा त्याला चालविण्याची किंवा कुटुंबाचा गाडा चालविण्याची असो, पुरुष आणि निसर्गाने समान रूपाने योगदान देणे गरजेचे आहे.
 
5 आदर्श गृहस्थ जीवन : सांसारिक दृष्टिकोनातून शिव-पार्वती आणि शिव कुटुंब हे गृहस्थ जीवनाचे आदर्श आहेत. पती-पत्नी मधील संबंधात प्रेम, समर्पण आणि जिव्हाळ्याचे उत्तम उदाहरण सादर करून त्यांनी आपल्या मुलांना देखील आदर्श बनवलं आणि एक पूर्ण कौटुंबिक जीवन आणि त्यांचा जबाबदाऱ्यांचे निर्वाह केलं.
 
6 पत्नीला देखील ब्रह्मज्ञान दिले: भगवान शिवने जेव्हा ब्रह्मज्ञा प्राप्त केले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी पार्वतीस हे ज्ञान कसं मिळवता येईल हे सांगितले होते. अमरनाथाच्या गुहेत त्यांनी आई पार्वतीला अमर ज्ञान दिले जेणे करून आई पार्वती देखील जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन कायम स्वरुपी त्याची अर्धांगिनी बनून राहील.
 
7 एकमेकांसाठी आदरभाव : वैवाहिक जीवनात एकमेकांमध्ये सुसंवाद, प्रेमाव्यतिरिक्त एकमेकांसाठी आदर असणं गरजेचं आहे. हे नसेल तर वैवाहिक जीवनात मतभेद होतात. शिवाच्या मनात आई पार्वती आणि पार्वतीच्या मनात शिवासाठी जे प्रेम आणि आदराची भावना आहे ते आदरणीय आहे. या पासून प्रत्येक जोडप्याला शिकवण मिळते. याचे अनेक उदाहरणे पुराणात आहेत की आई पार्वतीने शिवाच्या सन्मानासाठी सर्व काही सोडलं. तर शिवने देखील आई पार्वतीच्या प्रेम आणि सन्मानासाठी सर्व काही केलं. वैवाहिक जीवनात जर पती-पत्नी एकमेकांचे सन्मान करतं नाही त्यांचा सन्मानाचे रक्षण करतं नाही तर ते वैवाहिक जीवन पुढे जाऊन अपयशी होतं.
 
8 योगी बनले गृहस्थ : भगवान शिव हे एक महान योगी होते आणि ते नेहमीच समाधी आणि ध्यानात मग्न असायचे. पण हे आई पार्वतीचे प्रेमच असे ज्यामुळे योगी एक गृहस्थ झाले. गृहस्थाचे योगी असणे आवश्यक आहे तेव्हाच तो किंवा ती यशस्वी वैवाहिक जीवन जगू शकतो. भगवान शिव यांच्याबरोबर उलटं गंगा वाहिली. बरेच लोक असेही असतात जे लग्नानंतर वयाच्या अश्या टप्प्यावर जाऊन वैरागी बनतात आणि संन्यास घेऊन आपल्या बायकोला सोडतात, पण भगवान शिव तर आधीपासूनच योगी किंवा संन्यासी किंवा वैरागी होते. हे तर आई पार्वतीचे तप होते जे योगी गृहस्थ बनले. असे देखील म्हणता येईल की आई पार्वती देखील जोगण होत्या. बायको सह सात जन्माचे वचन घेतले असतील तर मग आपण या जन्मातच संन्यास घेण्यासाठी सोडून कसे जाऊ शकता ? भगवान शंकराने हे सर्वात मोठे उदाहरण दिले होते.
 
9 त्यागाची प्रतिमूर्ती : शिव आणि पार्वती ज्या प्रकारे एकमेकांसाठी निष्ठावान आणि त्यागी आहेत त्याच प्रमाणे निष्ठावान आणि त्यागेची भावना राम आणि सीतेने देखील पत्करली. पार्वतीचे शिवमय होणं आणि शिवाचे पार्वतीमध्ये लुप्त होण्याच्या या प्रेमामुळे त्यांना अर्धनारीश्वर देखील म्हणतात.
 
10 नेहमीच एकत्र राहणं आणि गोष्टी सामायिक करणं: पुराणकार म्हणतात की एका बाईने केवळ आपल्या वडील, भाऊ, नवरा, मुला, मुलीच्या घरात रात्रीच राहावं इतर कुठे ही रात्री थांबवायचे असल्यास सोबतीला वडील, भाऊ, मुलगा, मुलगी किंवा नवरा असणं गरजेचं आहे. ही तर एका सामान्य माणसाची गोष्ट आहे पण आई पार्वती आणि शिव तर अर्धनारीश्वर आहेत. त्यांची सोबत तर नेहमीच आहे आणि असणार देखील. असे वाचण्यात आले आहे की भगवान शिव नेहमीच पार्वतीच्या प्रश्नाचे उत्तर देतात आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या कथेमधून आपले गूढ सांगतात. अश्याच प्रकारे आई पार्वती देखील शिवाला आपले गूढ सांगत असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावणातील 5 सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक आहे, जाणून घ्या हे 5 गुपित....