Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रायव्हेट पार्ट्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

प्रायव्हेट पार्ट्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
, गुरूवार, 15 एप्रिल 2021 (13:53 IST)
प्रायव्हेट पार्ट काळे पडण्याची समस्या अगदी सामान्य असून नाजूक भाग असल्यामुळे त्यावर कुठलेही प्रयोग करण्यापूर्वी चारदा विचार करावा लागतो. शरीरातील काही भाग काळपट असल्यामागील कारणं म्हणजे उष्णता, बदलत असलेलं वातावरण, पुरेसं वारं लागत नसल्यामुळे सतत येणारा घाम इतर आहे. यामुळे त्वचा काळी पडते तसंच इन्फेशन होण्याची भीती देखील असते. परंतू कुठल्याही केमिकलचा वापर न करता काही घरगुती उपाय अमलात आणून यावर उपचार करता येऊ शकतो-
 
एक कप गरम पाण्यात एक चमचा ऐलोवेरा जेल मिसळावे. नंतर कॉटनच्या मदतीने प्रायव्हेट पार्टवर लावावं. 20 मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन घ्यावं.
चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करावं. हे मिश्रण प्रभावित भागावर लावावं. 10 मिनिटानंतर पाण्यानं धुवून घ्यावं.
एक चमचा हळदीत 2 चमचे लिंबाचा रस मिसळून त्यात एक चमचा दही मिसळावं. ही पेस्ट प्रभावित जागेवर लावून 15 मिनिटाने धुऊन घ्यावी.
प्रभावित जागेवर ऑलिव ऑयल लावून अर्धा तास तसंच राहू द्यावं नंतर अर्धा लिंबू चिरुन त्यावर मीठ टाकून त्या जागेवर हलक्या हाताने स्क्रब करावं. नंतर 30 मिनिटाने गुलाब पाण्याने धुऊन घ्यांव. आठवड्यातून तीनदा असे करता येऊ शकतं.
बेसनमध्य लिंबाचा रस, हळद व दही मिसळून तयार मिश्रण प्रभावित जागेवर लावावं. 10 ‍मिनिटाने स्क्रब करावं नंतर पाण्याने धुऊन घ्यावं. यानंतर बेकिंग सोडा लावावं. लवकरच परिणाम दिसून येतील.
बटाट्याने काळपटपणा दूर होण्यास मदत होते. अंघोळीच्या 10 मिनिटांपूर्वी लिंबाचा रस मिसळलेला बटाट्याचा रस लावावा. आपण बटाटा कापून देखील स्क्रब करु शकता.
फंगल इन्फेश्न असल्यास कडुलिंबाचे पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने प्रायव्हेट पार्टची सफाई करावी. 
 
टीप – ही केवळ माहिती म्हणून देण्यात आलेले उपाय आहे. याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्या