Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेहऱ्यावर सुरकुत्या होण्यामागील मुख्य 7 कारणे

चेहऱ्यावर सुरकुत्या होण्यामागील मुख्य 7 कारणे
, सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (11:53 IST)
आपणास देखील असं वाटत की आपले वय कमी आहे, पण चेहऱ्यावर सुरकुत्यांमुळे चेहर्‍यावरील चार्म गमावत आहे. जर होय, तर त्यामागील बरेच कारणे होऊ शकतात. जे आपण नकळत करत असतो. चला तर मग चेहऱ्यावर सुरकुत्या होण्यामागील कारणे जाणून घेऊ या. 
 
सुरकुत्या सरत्या वयाचा एक भाग आहे. कॉलेजनचे उत्पादन वेळेनुसार कमी होतं, ज्यामुळे आपली त्वचा लवचिकता गमावून बसते. सरत्या वयासह सुरकुत्या होणे स्वाभाविकच आहे, पण अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे अकाळीच सुरकुत्या दिसू लागतात. 

या मधील काही तर आपल्या दररोजच्या सवयीमुळे देखील असू शकत. जसे की साखरेचे सेवन किंवा सूर्याच्या प्रकाशात जास्त काळ राहिल्यामुळे आपल्या त्वचेवर फाईन लाइन्स दिसू लागतात. तथापि अद्याप उशीर झालेला नाही. आपण इच्छित असल्यास आपल्या दिनचर्येत आवश्यक बदल करून या सुरकुत्यांना चेहऱ्यावर येण्यापासून रोखू शकता.
 
* प्रदूषण -
आपल्या सर्वांसाठी प्रदूषणाची वाढती पातळी किती वाईट आहे. हे तर सर्वानाच माहित आहे. धूर,धूळ आणि धुकं या पासून त्वचेच्या फ्री रॅडिकल्स ला नुकसान होतं. या मुळे अकाळी वृद्धत्व आणि सुरकुत्या येऊ लागतात. नकारात्मक प्रभावाला कमी करण्यासाठी दिवसाच्या शेवटी आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करावे.
 
* आपल्या त्वचेला घासणे - 
जर आपण जोराने आपल्या चेहऱ्याला मेकअप वाईप किंवा टॉवेल ने चोळत असाल किंवा आयलायनर लावण्यासाठी आपल्या डोळ्याच्या भोवतीच्या त्वचेला ताणत असाल, तर या मुळे देखील सुरकुत्या येऊ शकतात. वारंवार असे करण्याची सवय आपल्या त्वचेसाठी नुकसानदायी होऊ शकते.
 
* पुरेशी झोप न घेणं - 
आपण झोप घेता त्यावेळी कॉर्टिसॉल( तणावाचे हार्मोन)ची पातळी स्वाभाविकरीत्या कमी होते. हे आपल्या त्वचेला दिवसभराच्या तणावापासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या त्वचेला या चक्रातून जाऊ देत. जर आपल्याला आवश्यक सौंदर्यवर्धक झोप मिळतं नसेल तर आपण या चक्रात व्यत्यय आणत आहात. कॉर्टिसॉलचे उच्च स्तर कॉलेजन तोडून सुरकुत्या वाढवतात.
 
* आपली झोपण्याची स्थिती -
जर आपल्याला पोटावर किंवा हाताला उशीखाली दाबून झोपण्याची सवय असल्यास, तर बऱ्याच काळ असे केल्यानं आपल्या चेहऱ्यावर काही डाग येऊ शकतात. याचा परिणाम रात्रभर दिसून येत नाही, पण नंतर लक्षात येत. या पासून वाचण्यासाठी पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा आणि त्वचेच्या सुरकुत्यांना कमी करण्यासाठी रेशीम किंवा सॅटिनची उशी वापरा.
 
* उच्च साखरयुक्त आहार घेणं -
साखर आपले वजन वाढविण्यात आणि त्वचेला अकाळी वृद्ध दाखविण्यात योगदान देते. साखर विरघळल्यावर ही ग्लायकेशन नावाच्या प्रक्रियेतून जाते. मुळात, ही कॉलेजन आणि इलॅस्टीनला बांधते आणि त्यांना कमकुवत करते. या मुळे फाईन लाइन्स आणि सुरकुत्या दिसून येतात. 

* सनस्क्रीन न लावणं -
सूर्यापासून निघणाऱ्या यूव्ही किरण आपल्या त्वचेमधील दिसणाऱ्या सुरकुत्यांसाठी सर्वात जास्त जवाबदार असतात.असुरक्षित असणाऱ्या अल्ट्राव्हायलट प्रकाशाच्या संपर्कात येऊन कॉलेजन खराब होऊ शकत, ज्यामुळे फाईन लाइन्स आणि सुरकुत्या होऊ शकतात. म्हणून आपल्या त्वचेला वाचविण्यासाठी नेहमी सनस्क्रीन वापरा.
 
* डिहायड्रेड त्वचा -
आपल्या त्वचेला सुरकुत्यांपासून वाचविण्यासाठी नेहमी हायल्युरोनिक ऍसिड असणाऱ्या उत्पादनांचा वापर करावा. हे आपल्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो,  ज्यामुळे डोळ्याच्या भोवती बनणाऱ्या फाईन लाइन्स कमी होतील. तसेच स्वतःला देखील आतून हायड्रेट ठेवा. दिवसभरातून किमान 8 ग्लास पाणी पिण्याचा नियम बनवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रेड दही वडा चटकन बनवा पटकन खा