हिवाळ्याच्या हंगामात लहान बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. या हंगामात सकाळ-संध्याकाळ चालणारी थंड हवा बाळाच्या आरोग्यास हानिकारक असते. या पासून वाचविण्यासाठी आपण बाळाला गरम उबींचे कपडे घालून ठेवावे जेणे करून बाळाचे शरीर उबदार राहील.
न्यूमोनियाचा त्रास एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांमध्ये जास्त करून आढळतो. आपण आपल्या बाळाच्या तब्बेतीची काळजी घेतल्यास शक्य आहे की आपल्या बाळाला न्यूमोनियाच्या त्रासापासून वाचवू शकाल. या साठी काय खबरदारी घ्यावयाची आहे जाणून घेऊ या.
1 हिवाळयात बाळाला सर्दी -पडसं, ताप, खोकला होऊ शकतात. म्हणूनच या परिस्थितीत निष्काळजीपणाने वागू नका. आपल्या बाळाला न्यूमोनियाचा धोका होऊ शकतो. सतत सर्दी खोकला, ताप येत असल्यास बाळाला त्वरितच डॉक्टरांकडे घेऊन जा.
2 नवजात मुलांना नेहमी टोपी, मोजे आणि उबदार कपडे घालून ठेवावं.
3 हवामान बदलल्यावर बाळाची विशेष काळजी घ्या कारण बदलत्या हंगामात मुलांचे आजारपण उद्भवतात.
4 सर्दी झाल्यास मुलांना उलट्या, अतिसार किंवा ताप असल्यास ताबडतोब बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
5 जर डॉक्टर बाळाला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देत असतील तर त्यांचा सल्ल्याकडे दुर्लक्षित करू नका.
6 जर बाळा आईचे दूध पीत नसल्यास याचे कारण सर्दी, खोकला समजून घरघुती उपचार करू नये.
7 बाळा झोपून उठल्यावर त्याला तातडीने मोकळ्या हवेत घेऊन जाऊ नये. असे केल्यानं बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून त्याची काळजी घ्या आणि आपल्या बाळाला या आजारापासून वाचवा.