Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भविष्य सूचित करतात हे पक्षी, जाणून घ्या 10 मान्यता

भविष्य सूचित करतात हे पक्षी, जाणून घ्या 10 मान्यता
दुनियाभरात हजारो-लाखो प्रकाराच्या धारणा प्रचलित आहे. तसे यामागील सत्य कोणालाच माहीत नाही. खरं म्हणजे हा प्रकार वैज्ञानिक संशोधकाचा विषय असू शकतो किंवा केवळ अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकतं.
 
अता श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा परंतु प्राचीन काळातील लोकांच्या अनुभवाने हा मान्यता गडलेल्या गेल्या आहे. येथे प्रस्तुत आहे अश्याच 10 धारणा ज्या पक्ष्यांच्या हालचालींशी जुळलेल्या आहेत. 
येऊ शकतं भूकंप : टिटहरी, एक लांब चोचीचा किनाऱ्यालगत आढळणारा मोठा पक्षी, ज्या दिवशी झाडावर बसलेला दिसतो त्या दिवशी भूकंप येण्याची शक्यता असते. कारणी हे पक्षी कधी झाडावर राहत नाही ते जमिनीवरच अंडी देतात आणि जमिनीवरच राहतात.
webdunia

वटवाघूळ घरात शिरल्यावर : घरात वटवाघळाचा प्रवेश होणार्‍या मृत्यूचे संकेत देतं. काही लोकांप्रमाणे हे घर रिकामे होण्याचे संकेतही देतं. इतर काही लोकांप्रमाणे वटवाघूळ असे रोग पसरवतं ज्याचा प्राचीन किंवा मध्यकाळात उपचार संभव नव्हता. म्हणून हा मृत्यूचा दूत मानला जात होता.
webdunia

कावळ्याचा आवाज : पहिल्या प्रहरीत कावळ्याचा आवाज येणं पाहुणे येण्याचे संकेत देतं. 
दुसर्‍या प्रहरी आवाज ऐकू आल्यास व्यवसायात लाभ होतो. 
पहिल्या प्रहरी दक्षिण दिशेत कावळ्याचा आवाज ऐकू आल्यास लाभ मिळतो.
मध्यान्ह मध्ये आवाज ऐकू आल्यास पद प्राप्ती होते.
परंतु तिसर्‍या आणि चौथ्या प्रहरी कावळ्याचा आवाज आल्यास वाईट समाचार प्राप्त होतात.
webdunia
एखाद्या शहरात किंवा गावात कावळ्यांचा कळप वाद निर्माण करतं.
घरावर अनेक कावळे बसल्यास मृत्यूतुल्य कष्ट झेलावं लागतं.
रस्त्यावर चालताना डोक्यावर कावळ्याचा स्पर्श आरोग्य आणि आयुष्यासाठी वाईट परिणाम देणारं असतं.
रात्री कावळे ओरडतं असल्या मोठी गडबड होण्याचे संकेत असतं.

घरात चिमणीचं घरटं: असे मानले आहे की घरात, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये चिमणीने घरटं तयार केलं तर समजून जा घरात आनंदी वातावरण राहील. याने संकट दूर होतं आणि घरातील सदस्यांचे चित्त प्रसन्न राहतं. काही लोकांप्रमाणे चिमणीने घरट्यात अंडी दिली असल्यास घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागते.
webdunia

वर्षा विचार : * जर माठातील पाणी गरम झालं, चिमणी धूळेत मस्ती करत असेल आणि मुंग्या अंडी घेऊन जाताना दिसत असतील तर लवकर पाऊस पडणार आहे.
 
* तितरचं जोडपं जेवत असेल आणि बृहस्पती पुष्य नक्षत्रात असल्यास त्या दिवशी पाऊस पडतो.
webdunia
* पावसाळ्यात कावळ्यांचे आवाज केल्याविना घरटी परतणे झमाझम पाऊस येण्याचे संकेत देतं. याविपरित आभाळ दाटून आल्यावरही कबूतरांचा कळप आकाशात उड्डाण भरण्याऐवजी झाडावर शांत बसलेले असेल तर याचा अर्थ गरजणारे ढग बरसणार नाही.

घुबड : घुबडाची आवाज रात्रीच्या प्रथम, द्वितीय आणि चुतुर्थ प्रहरी ऐकण्यास आली तर याला आपली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मानावे. याने अर्थ लाभ, व्यवसायात लाभ आणि राजदरबारात लाभ मिळेल. परंतु एकच दिशेत वारंवार आवाज होणे, दिसणे संकटाची सूचना देतं.  याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
webdunia

कोकिळेचा आवाज :  दिवसाच्या प्रथम प्रहरी कोकिळेचा आवाज ऐकू आल्यास नुकसान होऊ शकतं.
webdunia

बहिरी ससाणा : बहिरी ससाणा पक्षी दिवसाच्या प्रथम प्रहरी पूर्वीकडे दिसणे किंवा त्याची आवाज ऐकणे शुभ मानले आहे. वारंवार असं होत असल्यास शेती चांगली होते. परंतु इतर वेळी आवाज ऐकू येण्याने राज्यात संकट होण्याचे संकेत देतं.
webdunia

कोंबडा : दिवसाच्या प्रथम किंवा दुसर्‍या प्रहरी कोंबड्यांची आवाज ऐकू आल्यास जुन्या व्यक्तीची भेट होते व सुख-सुविधांमध्ये वृद्धी होते. तिसर्‍या आणि चौथ्या प्रहरी आवाज ऐकू आल्यास जखमी होणे किंवा आगीने पेटण्याचा वाईट प्रसंग घडू शकतो.
webdunia

कबुतराची आवाज : दिवसाच्या प्रथम प्रहरी कबुतराची गूतर गू ऐकू आल्यास अर्थ लाभ, तिसर्‍या प्रहरी ऐकू आल्यास विवाह किंवा प्रेम संबंध बनण्याचे योग असतात. परंतु चौथ्या प्रहरी ऐकू आल्यास हानी होते. कबुतर डोक्यावर उडून गेला तर जीवनातील कष्ट कमी होतात. परंतु कबुतर एखाद्या जागी राहत असल्यास त्याजागी राहणार्‍याचा नुकसान होतं.
webdunia
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज रात्रीपासून सुरू होईल ‘चोर’ पंचक, 28 पर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी