Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धार्मिक यात्रे दरम्यान का होतात जस्त अपघात, ज्योतिषात हे 7 कारण देण्यात आले आहे

धार्मिक यात्रे दरम्यान का होतात जस्त अपघात, ज्योतिषात हे 7 कारण देण्यात आले आहे
नेहमी ऐकण्यात किंवा वाचण्यात येत की एखाद्या पवित्र यात्रेहून परतताना लोकांच्या वाहनांचा रस्त्यात अपघात झाला. ज्यामुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला. तुम्ही या गोष्टींवर कधी लक्ष दिले आहे का, की हे अपघात जास्त करून धार्मिक यात्रेच्या वेळेस का होतात. याच्या मागचे मागे मोठे कारण असे ही होऊ शकतात की तुम्ही पूजा आणि संकल्प घेताना एखादी मोठी चूक केली असेल. ज्योतिष्यामध्ये याचे कारण सांगण्यात आले आहेत. म्हणून धार्मिक यात्रा करताना काही गोष्टींचे लक्ष ठेवणे फारच गरजेचे आहे.
 
संकल्प घेण्यात कमी
कुठल्याही तीर्थ यात्रेवर जाताना सर्वात आधी ज्या यात्रेसाठी निघणार आहे त्याचे संकल्प करा की हे देवा आमची यात्रा यशस्वी होऊ दे आणि यात्रे दरम्यान येणार्‍या सर्व व्याधींना दूर करण्यास आमची मदत कर. संकल्प न घेतल्यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता असते.
 
आपल्या कुळदेवी-देवतेची पूजा न करणे  
एखाद्या यात्रेवर जाण्या अगोदर कुटुंबीयांच्या सर्व सदस्यांना आपल्या कुळदेवी दैवताची पूजा करायला पाहिजे. बगैर पूजा केल्याने देखील अपघात होण्याची शक्यता असते.
 
अपुरी पूजा
कधी ही कोणत्याही तीर्थ यात्रे दरम्यान अपुरी पूजा नाही केली पाहिजे. अपुरी पूजेमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. पूजा पूर्ण करूनच यात्रेवरून  परत यायला पाहिजे.
 
वाहनाची पूजा
यात्रे वरून निघताना आधी तुम्ही ज्या गाडीने यात्रा करणार आहे त्याची पूजा अवश्य करायला पाहिजे. घरातून निघण्या अगोदर लिंबाला गाडीच्या चाकाखाली ठेवून त्या गाडीने यात्रा करायला पाहिजे. असे केल्याने तुमच्या यात्रेत कुठलीही बाधा येणार नाही.
 
चुकीच्या वस्तूंचे सेवन करू नये  
तीर्थ यात्रे दरम्यान मांस आणि दारूचे सेवन करू नये. या वर्जित वस्तूंचे सेवन केल्याने अपघात होण्याची शक्यता असते.
 
भिकारीचा अपमान करू नये  
देव दर्शन केल्यानंतर भिकार्‍यांचा अपमान करू नये. त्यांना दान आणि दक्षिणा जरूर दिली पाहिजे. अशी मान्यता आहे की देव भिकारीच्या स्वरूपात आपल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी येतात.
 
सुतकाचे खास लक्ष ठेवायला पाहिजे 
तीर्थयात्रे वर जाण्याअगोदर सुतकाचे लक्ष ठेवायला पाहिजे. कुटुंबात एखाद्या बाळाचा जन्म किंवा एखाद्या सदस्याची मृत्यू झाल्यावर सुतक लागतो. अशात यात्रे करणे टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती