Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ
नवी दिल्ली , गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (15:24 IST)
मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगना मुदतवाढीची मागणी करणार्यास करदात्यांना केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 10 दिवसांनी वाढविली आहे. आता करदात्यांना 10 जानेवारी 2021 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल.
 
दरवर्षी 31 जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा कोरोना संकट आणि त्यात लागू केलेली कठोर टाळेबंदी यामुळे अर्थ मंत्रालयाकडून दोनवेळा मुदत वाढवण्यात आली होती. 31 जुलैनंतर 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी एक महिन्याची वाढ करून 31 डिसेंबरपर्यंत कालावधी वाढवून दिला होता. मात्र तरीही बहुतांश करदात्यांना विवरण पत्र सादर करण्यात अडचणी येत होत्या. सोशल मीडियावर मुदतवाढीची मागणी करण्यात येत होती.
 
बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत 10 जानेवारी 2021 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याशिवाय जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्याठत आली आहे. अंतिम मुदतीपर्यंत विवरण सादर केले नाही तर 1 जानेवारी 2021 किंवा त्यानंतर रिटर्न फाईल करणार्याम करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. ‘आयकर कलम 234 एफ'नुसार हे दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे. यात किमान एक हजार ते जास्तीत जास्त 10 हजारांचा भुर्दंड सहन करावा लागेल.
 
आयकर विभागाच्या माहितीनुसार बुधवारी देशभरातून 8 लाख 96 हजार करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल सादर केली आहे. शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता करदात्यांनी इन्कम  टॅक्स रिटर्न फाईल लवकरात लवकर भरावी, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. करदात्यांना आयकर विभागाच्या वेबसाईटवरून देखील आयकर रिटर्न फाईल करता येईल. ई-फायलिंगसाठी यूझरला आयकर विभागाच्या वेबसाइटवर यूझर आडी, पॅन नंबर, पासवर्ड, जन्म तारीख आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नसाठी दिलेल्या सूचनांनुसार मा
हिती सादर करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ४ हजार ९१३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज