कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 2020- 21 या चालू आर्थिक वर्षात 8.50 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय ईपीएफओ संघटनेच्या विश्वस्तांनी गुरुवारी घेतला. कोरोना संकटात केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट झाली होती. तसेच या काळात कर्मचार्यांरनी पीएफ फंडातून मोठी रक्कम काढली होती.
त्यामुळे पीएफ'वरील व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता होती. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच 8.5 टक्के कायम ठेवला असून त्यामुळे जवळपास सहा कोटी पीएफ सभासदांना दिलासा मिळाला आहे.