Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्टो कारने १५ वर्षांत विक्रीतील ३८ लाखांचा टप्पा ओलांडला

अल्टो कारने १५ वर्षांत विक्रीतील ३८ लाखांचा टप्पा ओलांडला
भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या, मारुती अल्टो कारने गेल्या १५ वर्षांत विक्रीतील ३८ लाखांचा टप्पा ओलांडला असल्याचं जाहीर केलं आहे. ऑल्टोच्या अतुलनीय कामगिरीमुळे ही सलग १५ वर्षात चांगली  विक्री होणारी कार ठरत आहे. 
 
मारुती सुझुकीने अल्टोच्या डिझाइन आणि टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही बदल केले आहेत. सोबतच कंपनीने कारच्या किंमतीही परवडणाऱ्या दरात ठेवल्या. नवीन अल्टो भारतातील पहिली बीएस६ एन्ट्री सेगमेन्ट कार आहे. याची इंधन क्षमता २२.०५ किलोमीटर प्रति लीटर इतकी आहे.
 
नवीन डिझाइन आणि सेफ्टी फिचर्ससह अल्टो वापरकर्त्यांना चांगला अनुभव देत असल्याचं ग्राहक सांगतात. नव्या अल्टोमध्ये अॅन्टीलॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्रायव्हर-को-ड्रायव्हर दोघांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर असे सेफ्टी फिचर्स सामिल आहेत. ही कार ग्राहकांसाठी सीएनजीमध्येदेखील उपलब्ध करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच व्हॉट्सअॅपचे Dissapearing Message फीचर येणार