Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवकरच व्हॉट्सअॅपचे Dissapearing Message फीचर येणार

लवकरच  व्हॉट्सअॅपचे Dissapearing Message  फीचर येणार
व्हॉट्सअॅपने  नवं फीचर लाँच करत आहे. यामध्ये युजर्स ऑटोमॅटिक आपले मेसेज डिलीट करु शकणार आहे. त्यासोबत युजर्स मेसेज डिलीट करण्यासाठी आपल्या सोयीनुसार वेळही निवडू शकणार  आहे. व्हॉट्सअॅपने लाँच केलेल्या फीचरचे नाव Delete Messages असं आहे. या फीचरने नाव Dissapearing Message असे ठेवण्यात आले होते. हे नवं फीचर युजर्ससाठी अजून उपलब्ध झालेले नाही. या फीचरची टेस्टिंग केली जात आहे. पण लवकरच हे फीचर सुरु करण्यात येणार आहे.
 
व्हॉट्सअॅप अपडेट ट्रॅकिंग वेबसाईट WABetaInfo ने या फीचरचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे युजर्समध्ये उत्सुकता वाढली आहे. हे फीचर नवीन बीट व्हर्जन डाऊनलोड केल्यावरही दिसणार नाही. हे फीचर कॉन्टॅक्ट इन्फो किंवा ग्रुप सेटिंगमध्ये दिलेले असेल. हे फीचर इनेबल करण्याचा अधिकार अॅडमिनकडे असणार आहे.या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप युजर्सला स्वत:चे मेसेज डिलिट करण्याची सुविधा देणार आहे. ऑटोमॅटिकली डिलीट करण्यासाठी 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना आणि 1 वर्षाचे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार यामध्ये वेळ निवडू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदची शपथ