Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनविरोधी भावना: वैद्यकीय उपकरण उद्योगासाठी संधी

चीनविरोधी भावना: वैद्यकीय उपकरण उद्योगासाठी संधी
, शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:25 IST)
श्री. सत्येंद्र जोहरी, संस्थापक आणि अध्यक्ष, जोहरी डिजिटल हेल्थकेअर लिमिटेड
भारत वेगाने विकसित होणारा वैद्यकीय उपकरण बाजारपेठ राहिला आहे, मागील काही वर्षांपासून संयुक्त उद्यम, करार आणि अनेक नियामक सुधारणांच्या मदतीने देशाने उल्लेखनीय वाढ पाहिली आहे ज्यामुळे भारतात परकीय गुंतवणूकी आणि उत्पादन सुविधा निर्माण झाली आहे. वैद्यकीय उपकरण उद्योगाने विविध आव्हाने, फायदे पाहिले आहे परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने विविध संधीं पाहिली आहे.
 
कोविड१९ चा उद्रेक आणि परिणामी जगभरात चीनविरोधी भावना जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येण्याची संधी म्हणून पाहिली पाहिजे. जागतिक उत्पादक कंपन्यांना येथे आधार तयार करण्यासाठी आकर्षित करण्याकरीता आवश्यक घटकांपैकी बहुतेक घटक भारताकडे आहेत, परंतू गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करणे, अनुसंधान व विकास यावर जास्त खर्च करणे यासारख्या बाबींवर कार्य केले पाहिजे. दुसरीकडे, भारत सरकारद्वारे आत्म-निर्भर होण्याकरीता करण्यात आलेल्या आवाहनामुळे स्थानिक उत्पादन वाढेल आणि भारतात व्यवसाय करणार्यात कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल.
 
व्यापार संबंधांची पुनर्रचना
कोविड१९ नंतर निर्माण झालेल्या चीन-विरोधी भावना आणि अमेरिका-चीन व्यापार युद्ध यामुळे व्यापार संबंधांची पुनर्रचना झाली आहे कारण अनेक देश अधिक नैतिक, स्थिर देशात व्यवसाय स्थापित करण्याचा विचार करत आहेत. जपानने आधीच चीनच्या बाहेर व्यवसाय नेणार्यास कंपन्यांसाठी सॉप्सची घोषणा केली आहे, भारत आशियाई मूळचा असल्याबरोबरच, चीनशी भौगोलिक निकटता, जमीनीची उपलब्धता व स्वस्त मजुरी ही चीनबाहेरील जाणाऱ्या व्यवसायाला मिळवण्यासाठी स्पष्ट उमेदवार आहे. चीनमध्ये गुंतवणूक असलेल्या बर्यााच जागतिक वैद्यकीय उपकरण कंपन्यांना त्यांच्या सरकारांकडून उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी त्यांनी भारताचा विचार करावा असे सांगण्यात आले आहे. ही परिस्थिती भारताला जागतिक कराराचे उत्पादन केंद्र बनण्याची चांगली संधी देते.
 
गुणवत्तेसाठी नियामक प्रोत्साहन
गुणवत्ता, नावीन्यपूर्ण, किंमती स्पर्धात्मकतेत सुधारणा करण्यासाठी भारतीय आरोग्यसेवा परिसंस्थेला नियामक प्रोत्साहन मिळाले आहे. बर्यााच मंजूर प्रक्रिया सुलभ करण्यात आलेल्या आहेत, क्लिनिकल चाचणी मजबूत करण्यात आलेली आहे, स्थानिक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतात उत्पादित आणि विकल्या जाणार्यात सर्व वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा, कार्यक्षमता आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन नियामक चौकट सरकारच्या विचाराधीन आहे.
 
आत्मनिर्भर भारत अणि मेक इन इंडिया उपक्रम
भारताचे आत्मनिर्भर धोरण आणि मेक इन इंडिया, ज्याचे उद्दीष्ट देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे व निर्यातीवर कमी अवलंबून राहणे आहे, हा बहुउद्देशीय दृष्टीकोन आहे, यामुळे केवळ देशांतर्गत उत्पादनालाच चालना मिळणार नाही तर रोजगार निर्मिती देखील होईल, नाविन्यास सुधारण्यास मदत होईल, देशांतर्गत उत्पादन व विक्री केल्यास उत्पादनांची किंमत कमी होईल. सध्या, भारत आपल्या वैद्यकीय उपकरणांच्या गरजेसाठी आयातीवर अवलंबून आहे, येथे एक मोठा अंतर आहे ज्यावर कार्य करण्याची आवश्यकता आहे, केवळ हेच नाही तर एकदा आत्मनिर्भर बनल्यास भारतीय कंपन्या वैद्यकीय उपकरणांच्या निर्मिती व निर्यातीत जागतिक नेते बनू शकतात. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी मजबूत सप्लाय चेन सिस्टम महत्वपूर्ण आहे.
 
संयुक्त राष्ट्रच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या 17.7% इतकी आहे जी गुणात्मक आरोग्य सेवा देण्यासाठी स्वतः एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणूनच, भारतीय वैद्यकीय उपकरण कंपन्यांसमोर प्रवेश आणि वापर वाढविण्यासाठी खर्चिक-स्पर्धात्मक आणि प्रभावी अशी वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचे आव्हान आहे. या संदर्भातच सध्याची परिस्थिती उद्योगासाठी महत्त्वपूर्ण बनते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन