Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Royal Enfieldची सर्वात शक्तिशाली बाइक भारतात लॉन्च होणार आहे! किंमत जाणून घ्या

Royal Enfieldची सर्वात शक्तिशाली बाइक भारतात लॉन्च होणार आहे! किंमत जाणून घ्या
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (15:19 IST)
रॉयल एनफील्डने EICMA मोटर शो 2018 मध्ये आपली सर्वात शक्तिशाली बाइक बॉबर 838 सादर केली. पण त्यावेळी कंपनीने त्याबद्दल फारशी माहिती उघड केली नव्हती. पण आता कंपनी भारतात लाँच करण्याची तयारी करत असल्याचे समजते.
 
शक्तिशाली इंजिन 
इंजिनाबद्दल बोलताना, लिक्विड कूल्ड, इंधन इंजेक्टेड 834ccचे सर्वात शक्तिशाली इंजिन Bobber 838 मध्ये देण्यात आले आहे. जे सुमारे 90-100 Hp ची शक्ती देते. याशिवाय यात 6 स्पीड गिअर बॉक्स देखील मिळतील. मीडिया रिपोर्टनुसार ही बाइक पोलरिस इंडस्ट्रीज आणि आयशर (Eicher) मोटर्सने तयार केली आहे. एवढ्या मोठ्या इंजिनामध्ये येणारी रॉयल एनफील्डची ही पहिली बाइक असेल.
 
वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांविषयी सांगायचं तर या नवीन बाइकमध्ये ट्विन एक्झॉस्ट मफलर, फ्रंट व्हीलमध्ये ट्विन डिस्क ब्रेक, फ्लॅट हँडलबार आणि मोठे व्हीलबेस आहे. या बाइकच्या पुढील भागामध्ये टेलिस्कोपिक फॉर्क व मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. यात ड्युअल चॅनल ABS फीचरसुद्धा आहे. त्यात एक जागा आहे. तर दुसर्‍या जागेसाठी पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
 
डिझाइन
बाइकची रचना खूप आक्रमक दिसते. त्याची अंगभूत गुणवत्ता देखील खूप भरीव दिसते. यात पूर्ण एलईडी हेडलॅम्प्ससह डीएलआर आहेत. सांगायचे म्हणजे EICMA  मोटर शो 2018 मध्ये Bobber 838चा कॉन्सेप्ट मॉडल सादर करण्यात आला होता पण याचे उत्पादन मॉडेल देखील खूप संकल्पनासारखे असू शकते. कंपनी पुढच्या वर्षीच्या ऑटो एक्स्पो दरम्यान हे लाँच करू शकते. 2021 मध्ये ही बाइक लॉन्च केली जाऊ शकते असा विश्वास माध्यमांद्वारे व्यक्त केला जात आहे, परंतु कंपनीने अद्याप या बाइकच्या लाँचिंगबद्दल काहीही सांगितले नाही. Bobber 838 ची संभाव्य किंमत सुमारे 6 लाख रुपये असू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JIO ची धमाल, 'ऑल-इन-वन' योजना, दुसर्‍या नेटवर्कवर 1000 मिनिट कॉलिंग फ्री