Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bajaj ने Pulsar 125 चा स्पोर्टी वर्जन केला लाँच, आपल्या सेगमेंटची सर्वात पावरफुल बाइक

Bajaj ने Pulsar 125 चा स्पोर्टी वर्जन केला लाँच, आपल्या सेगमेंटची सर्वात पावरफुल बाइक
, गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (13:28 IST)
बजाज ऑटोने नुकतेच पल्सर सिरींजला पुढे वाढवत नवीन पल्सर 125 Neonला भारतात लाँच केले होते, जी लोकांना पसंत येत आहे. पल्सर 125 Neon आपल्या सेगमेंटची सर्वात पावरफुल बाइक आहे. आणि आता कंपनीने याच सेगमेंटमध्ये पल्सर 125 ला स्प्लिट सीटसोबत सादर केले आहे. तर जाणून घेऊया काय नवीन आणि खास आहे यात ..  
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार बजाजची नवीन पल्सर 125 स्प्लिटची किंमत 70,618 (एक्स-शोरूम, हैदराबाद) ठेवण्यात आली आहे. ही बाइक दोन वेरिएंट ड्रम आणि डिस्क ब्रेकसोबत उपलब्ध आहे. जेव्हाकी पल्सर Pulsar 125 Neon च्या ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 64,000 रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आणि डिस्क ब्रेक वेरिएंटची किंमत 66,618 रुपये आहे. अर्थात स्लिप वेरिएंट 4,000 रुपये ते 6000 रुपयांपर्यंत महाग आहे.  
 
नवीन पल्सर 125 स्लिपमध्ये ग्लोसी ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू कलर उपलब्ध आहेत. कंपनीने याला नवीन स्प्लिट सीट, टँक श्रौड्स, नवीन ग्राफिक्स, बेली-पॅन, क्रोम फिनिश टँक आणि कार्बन फायबर फिनिश सारखे मोठे बदल केले आहे. हे सध्या असलेल्या पल्सर 125 Neon पेक्षा थोडी वेगळी आणि स्पोर्टी दिसत आहे.   
 
नवीन पल्सर 125 स्प्लिटमध्ये देखील तेच इंजिन देण्यात आले आहे जे सध्याच्या पल्सर 125 Neon ला पावर देतो. यात DTS-i पेटेंट टेक्नॉलॉजीने लेस 4 स्ट्रोक, 2 वाल्व, 125cc चा बीएस-IV इंजिन मिळेल जो 12PS ची पावर आणि 11NM चे टॉर्क देईल. त्याशिवाय यात 5-स्पीड गियरबॉक्स सोबत एक प्रायमरी किक देण्यात आली आहे, ज्यामुळे रायडर कोणत्याही गियरमध्ये फक्त क्लच दाबून बाइक स्टार्ट करू शकतो. ब्रेकिंगसाठी एक लीटरमध्ये ही बाइक 57 ते 58 किलोमीटरची मायलेज देईल. जेव्हाकी सध्याची पल्सर 125 Neon एक लीटरमध्ये 57.5 किलोमीटरचे मायलेज देते. नवीन पल्सर 125 स्प्लिटचा सरळ सामना होंडा CB शाइन आणि हीरो मोटोकोर्प ग्लॅमरशी होणार आहे.    
 
125cc सेगमेंटमध्ये असल्यामुळे बाइकमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम नाही देण्यात आला आहे. पण त्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी यात CBS (combined braking system) देण्यात आले आहे. CBS च्या मदतीने बाइकला लवकर रोखण्यात मदत मिळते. याच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा मिळते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवणात मीठ-तिखट जास्त पडलं म्हणून बायकोला घटस्फोट दिला