Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार लॉन्च

टाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार लॉन्च
, गुरूवार, 18 एप्रिल 2019 (16:58 IST)
बजाज क्यूट विकत घेण्याची योजना करणार्‍या लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनीने सांगितले की ही भारतात 18 एप्रिल 2019 रोजी लॉन्च होईल. क्वाड्रिसिकल सेगमेंटची ही देशात पहिली गाडी असेल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने तिला बाजारात आणण्याची परवानगी दिली आहे. 
 
बजाज क्यूट एक फोर-व्हीलर वाहन आहे. दिसण्यात तर ही एक कार सारखी आहे, पण प्रत्यक्षात ही कार नसून थ्री व्हीलर ऑटो रिक्शाचा फोर व्हीलर व्हर्जन आहे. त्यात एक स्टियरिंग व्हील आणि चार चाके आहे. यात ड्रायव्हरसह एक पॅसेंजर सीट देखील देण्यात आली आहे. चालक समेत एकूण चार लोक यात बसू शकतात. सर्व प्रवाशांसाठी यामध्ये सीट बेल्ट देखील देण्यात आले आहेत. ते भारतात निर्यात करून विकली जाईल. 
 
बजाज क्यूटमध्ये 216.6 सीसीचा पेट्रोल इंजिन मिळेल. हे सीएनजीने देखील चालवले जाऊ शकते. पेट्रोल मोडमध्ये हे 13 पीएसची पावर आणि 8.9 एनएमचा टॉर्क तयार करेल. सीएनजी मोडमध्ये ती 10.98 पीएसची पावर आणि 16.1 एनएमचा टॉर्क तयार करेल. यात मोटरसायकल सारखेच 5-स्पीड सिक्वेंशल गियरबॉक्स मिळतील. बजाज क्यूटची लांबी 2752 मिमी असेल आणि वजन 451 एनएम असेल.
 
याची किंमत सुमारे 2 लाख रुपये असू शकते. किमतीच्या दृष्टीने ही टाटा नॅनोपेक्षाही स्वस्त असेल. थ्री व्हीलर ऑटो रिक्शापेक्षा प्रवासी यात अधिक सुरक्षित राहतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सॅमसंग इंडियाने गॅलॅक्सी A70 वरून पडदा काढला, जाणून घ्या त्याची किंमत