Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bajaj Platina 100 KS: नवीन फीचरसह बजाजची सर्वात स्वस्त बाइक

Bajaj Platina 100 KS: नवीन फीचरसह बजाजची सर्वात स्वस्त बाइक
, बुधवार, 27 मार्च 2019 (16:49 IST)
* नवीन किकस्टार्ट वेरिएंट्स सीबीएस सह सुसज्ज 
* बाइकमध्ये ComforTec' तंत्र 
* 104 किमी प्रति लीटर मायलेज
 
Bajaj Platina कमी किंमत आणि अधिक चांगल्या मायलेजसह भारतात खूप लोकप्रिय आहे. आता कंपनीने प्लॅटिना 100 किक स्टार्ट (केएस) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ही बजाजची सर्वात स्वस्त बाइक आहे आणि  त्याची दिल्ली शोरूम किंमत 40500 रुपये आहे. 
 
सरकारच्या निर्देशानुसार 125 सीसी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या सर्व बाइक बनवणार्‍या कंपन्यांना आपल्या बाइकमध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम लावणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवून बजाजने आपल्या या कम्प्यूटर  बाइकला अपडेट केलं आहे. 
 
बजाज ऑटोच्या मते ही बाइक केवळ भारतीय बाजारात नव्हे तर इतर देशांमध्ये देखील कम्प्यूटर सेगमेंटमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय बाइक आहे. कंपनीने या बाइकमध्ये 'ComforTec' तंत्र वापरला आहे, ज्याने राइड आणखी  आरामदायी बनेल. कंपनीच्या मते प्लॅटिना या श्रेणीतील बाइकमध्ये आरामदायक प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी आहे. बाइक आपल्या डीटीएस-आय तंत्रज्ञानामुळे चांगले मायलेज देखील देते. नवीन किकस्टार्ट व्हेरिएंट सीबीएस  सज्ज आहे. नवीन प्लॅटिना 100 के एस सिल्व्हर डिकल्ससह इबोनी ब्लॅक आणि कॉकटेल वाइन रेडमध्ये मिळेल. दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत 40,500 रुपये आहे.
 
Platina 100 KS मध्ये 102 सीसी क्षमतेच्या DTS-i इंजिनाचा वापर झाला आहे, जे 7.9 पीएसची पॉवर आणि 8.34 एनएमचा टॉर्क तयार करतो. बाइकची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनी दावा करते की  बाइक 104 किलोमीटर प्रति तासाचा मायलेज देते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मायकल शूमाकरचा मुलगा बहरीनमध्ये फेरारी बरोबर फॉर्म्युला वनची टेस्टिंग करेल