Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स
, बुधवार, 18 एप्रिल 2018 (08:52 IST)
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता जीमेलमध्ये अनेक नवे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. जीमेलमध्ये आपोआप ईमेल डिलीट करणारं नवं फीचर येणार आहे. ठरावीक कालावधीनंतर ईमेल आपोआप डिलीट होईल असं हे फीचर असणार आहे. ईमेल कंपोज करताना युजर एका छोट्या ‘लॉक’ आयकॉनला क्लीक करुन पाठवत असलेल्या मेलची ‘एक्सपायरी डेट’ ठरवू शकतो.  ‘confidential mode’ असं या आयकॉनचं नाव आहे. म्हणजेच, ईमेल पाठवणारा व्यक्ती तो केव्हा डिलीट करायचा हे ठरवेल.
 

‘confidential mode’ नुसार ईमेल मिळालेला व्यक्ती मेलमधील कंटेंट कोणाशीही शेअर करु शकणार नाही. इतकंच नाही तर, कंटेंट कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट देखील करता येणार नाही. ईमेल केव्हा डिलीट करायचा याची वेळ मेल पाठवणारा (सेंडर) ठरवेल. मेल डिलीट करण्याची वेळ एक आठवडा, एक महिना किंवा काही वर्ष देखील असू शकते. याशिवाय नव्या मेलमध्ये पासवर्ड प्रोटेक्शनचं महत्त्वाचा पर्याय देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे. नव्या जीमेलमध्ये ई-मेल snooze करण्याचा पर्याय देखील असेल, तसंच कंपनी एक ऑफलाइन ईमेल स्टोरेजचा पर्याय देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खानला दिलासा, परदेशवारीला परवानगी