फेब्रुवारी महिन्यात अनेक बदल होणार आहे. या महिन्यात आपल्या बँकेशी निगडित काही काम असेल तर फेब्रुवारीत पडणार्या सुट्टयांबद्दल जाणून घ्या. या महिन्यात कधी-कधी सुट्टी आणि बँक हॉलिडे आहे जाणून घेणे आवश्यक आहे-
उल्लेखनीय आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशानिर्दशांनुसार प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी बँकांना सुट्टी असते. तसेच आरबीआई कडून राष्ट्रीय आणि क्षेत्रीय आधारावर काही सुट्टयांचे निर्धारण केले गेले आहे.
फेब्रुवारीबद्दल सांगायचं तर शनिवारी आणि रविवार वगळता देशातील विविध क्षेत्रांमध्ये 7 दिवस बँकांना सुट्टया आहे. अर्थात फेब्रुवारीत सात दिवस बँका बंद राहतील. वेगवेगळ्या राज्यांच्या सणाप्रमाणे सुट्टया आहेत.
फेब्रुवारी मध्ये 12 फेब्रुवारीला सोनम लोसार या निमित्ताने सिक्किम येथील बँकांना सुट्टी आहे. तर 15 फेब्रुवारी रोजी लुई नगाई नी यादिवशी मणिपुरच्या बँका बंद राहतील. 16 फेब्रुवारीला वसंत पंचमी निमित्ताने हरियाणा, उड़ीसा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल येथील बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. 20 फेब्रुवारी रोजी अरुणाचल आणि मिजोरम येथील बँका बंद राहतील. जेव्हाकी 26 फेब्रुवरीला हजरत अली जयंती या निमित्ताने उत्तर प्रदेशाच्या बँकांना सुट्टी राहील. तर 27 फेब्रुवारीला गुरू रविदास जयंतीला चंडीगढ़, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब येथील बँका बंद राहतील. या सुट्टयांव्यतिरिक्त दुसर्या आणि चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी बँका बंद राहतील.