कोणत्याही बँकेची शाखा कमी किमतीची नाणी किंवा नोटा नाकारु शकत नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत. तरी विविध बँकांच्या शाखांनी अल्प किमतीची नाणी किंवा नोटा नाकरल्याच्या तक्रारी येत आहेत, असं आरबीआयने सांगितलं. सदरच्या आदेशाचं गैरपालन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं.
नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करण्यास बँकांनी नकार दिल्यास दुकानदार किंवा छोटे व्यापारीही ग्राहकांकडून नाणी घेणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होईल, असं आरबीआयने स्पष्ट केलं. 'कोणत्याही किमतीची नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करावीत, अशा सूचना सर्व बँकांनी तात्काळ आपापल्या शाखांना द्याव्यात' असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले. एक आणि दोन रुपयांची नाणी वजनावर घ्यावीत, असी सल्लाही आरबीआयने दिला.