Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत कोट्यवधींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत कोट्यवधींचा घोटाळा
मुंबई , गुरूवार, 15 फेब्रुवारी 2018 (09:42 IST)
देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबई शाखेत जवळपास 1.77 अब्ज डॉलरचा (अंदाजे 1 लाख 13 हजार कोटी रुपये) घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. 
 
मुंबईतील एका शाखेतून ठरावीक खातेदारांना लाभ ळिवून देण्यासाठी बेकायदा व्यवहार होत असल्याचे बँकेच्या लक्षात आले आहे. बँकेने या घोटाळ्याविषयी मुंबई शेअर बाजाराला माहिती दिली आहे. या घोटाळ्याचा परिणाम अन्य बँकांवरही होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने आप जाहीर केलेली नाहीत. मात्र,त्यांची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे, असे बँकेने सांगितले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे समभाग 4 टक्क्यांनी कोसळले आहेत. दरम्यान पीएनबीच्या तक्रारीनंतर उद्योगपती नीरव मोदीविरोधात चौकशी सुरू केली आहे, असे सीबीआयने गेल्या आठवड्यात सांगितले होते. पीएनबीने मोदी आणि इतर काही जणांविरोधात 4.4 कोटी डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. दरम्यान, आताच्या प्रकरणाशी या घोटाळ्याचा काही संबंध आहे का, हे अद्याप समजू शकलेले नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहिदांना धर्म नसतो : अनबू