बिअरवर एक्साईज कर 25 ते 35 टक्के वाढवल्यामुळे महाराष्ट्रात बिअरचे दर वाढणार आहेत. माईल्ड बिअरचा पिंट (330 मिली) पिण्यासाठी 3 रुपये, तर स्ट्राँग बिअर पिण्यासाठी साडेचार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. माईल्ड बिअरची पूर्ण बॉटल (650 मिली) रिचवण्यासाठी 5 रुपये, तर स्ट्राँग बिअरच्या पूर्ण बॉटलसाठी साडेसहा रुपयांची दरवाढ होणार आहे.
राज्य सरकारने माईल्ड बिअरवर 25 टक्क्यांनी, तर स्ट्राँग बिअरवर 35 टक्क्यांनी जकात कर वाढवला आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर एक्साईज ड्युटी मोजली जाते. विक्रीची किंमत किंवा एमआरपी ही व्हॅट (35 टक्के) आकारल्यानंतर ठरते. त्यामुळे प्रत्येक ब्रँडची नवीन किंमत येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईजर यासारख्या ब्रँड्सच्या पिंटची किंमत 60 ते 100 रुपयांच्या घरात आहे, तर एका बॉटलसाठी सध्या 110 ते 230 रुपयांच्या दरम्यान रक्कम मोजावी लागते.