rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालक बेपत्ता तर शेअर मार्केट मध्ये सीसीडीचे शेअर कोसळले

CCD share down
भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई व प्कॅरसिद्फेध हॉटेल  कॉफी डेचे (सीसीडी) मालक , संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता आहेत.  मंगळुरू पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध  घेत आहेत. सिद्धार्थ यांचा शोध सुरु असतानाच शेअर बाजारामध्ये सीसीडीचे शेअर्स २० टक्यांनी घसरले आहेत. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. साकलेशपूर येथे एका महत्वाच्या मिटिंगसाठी जाताना वाटतेच सिद्धार्थ बेपत्ता झाले होते. 
 
सिद्धार्थ हे शेवटी नेत्रावती नदीवरील उल्लाल पूलाजवळ दिसले होते. मंगळूरहून साकलेशपूरला जातना ५५ वर्षीय सिद्धार्थ यांनी अचानक आपल्या गाडीच्या चलाकाला गाडी थांबवण्यास सांगितले सोबतच  मी येथे  खाली वॉकला जाऊन येत असं सांगून ते निघून गेले.  २०० हून अधिक पोलीस कर्मचारी, २५ बोटी या पुलाच्या परिसरामध्ये नदीमध्ये सिद्धार्थ यांचा शोध घेत असून, बोटींबरोबर पोलीसांनी स्निपर कुत्र्यांनाही आणले आहे. सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत सापडले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपात प्रवेश