जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकासदर (जीडीपी) 3.1 टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत (जीडीपी) 4.1 टक्के (सुधारित) होता. तर 2019-20 या आर्थिक वर्षाचा विकासदर (जीडीपी) 4.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या वर्षात तो 6.1 टक्के होता. विकासदराची गेल्या 11 वर्षातील नीचांकी कामगिरी आहे.
कोरोनाने अर्थव्यवस्थेला पुरते जखडून ठेवले आहे. देशात 25 मार्चपासून कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरु आहे. सध्या चौथा लॉकडाउन सुरु असून तो 31 मे रोजी संपुष्टात येईल. मात्र या लॉकडाउन काळात जवळपास 12 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंद्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सरकारने कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पॅकेज जाहीर केले आहे.
आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था यंदा उणे विकासदर नोंदवेल असा अंदाज यापूर्वीच्या काही संस्थांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षभरापासून सुरु असलेला मंदीचा फेरा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारकडून जाहीर होणार्याद जीडीपी आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.