Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विक्रमी संख्येने कोरोना बाधितांना डिस्चार्ज

विक्रमी संख्येने कोरोना बाधितांना डिस्चार्ज
, शनिवार, 30 मे 2020 (09:59 IST)
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. उर्वरीत जे १५-१६ टक्के जे रुग्ण आहेत त्यांना मध्यम प्रकारात मोडणारी लक्षणं दिसत आहेत. व्हेंटिलेटर अवघ्या दीड टक्के लोकांना लागतो आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
आजची संख्या मी जाणीवपूर्वक अधोरेखित जोडतो आहे. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४३ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा ३.३ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे दीड टक्के लोक जे व्हेंटिलेटरवर जाऊ शकतात याचाच अर्थ ९७ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत ही बाब महत्त्वाची आहे. घाबरुन जाऊ नका पण सावध रहा असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच मोबाईलचे १० आकडे इतिहासजमा, ट्रायने दिला प्रस्ताव