Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गरुड ड्रोन लवकरच स्विगी किराणा मालाचे वितरण करणार, दिल्ली -बेंगळुरू मध्ये लवकरच सुरु होणार प्रकल्प

गरुड ड्रोन लवकरच स्विगी किराणा मालाचे वितरण करणार, दिल्ली -बेंगळुरू मध्ये लवकरच सुरु होणार प्रकल्प
, सोमवार, 2 मे 2022 (21:51 IST)
गरुड एरोस्पेस स्टार्टअप मधील गरुड ड्रोन (Garud Drone)लवकरच बेंगळुरूमध्ये स्विगी साठी किराणा मालाचे वितरण करेल. गरुड एरोस्पेस ही ड्रोनसेवा देणारी कंपनी आहे. गरुड एरोस्पेस चे संस्थापक आणि सीईओ अग्नीश्वर जयप्रकाश यांनी  स्विगी ने सुरु केलेला हा पायलट प्रकल्प असल्याचे सांगितले. 
 
ते म्हणाले, मे महिन्याच्या आठवड्यात हा प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे. स्विगी ड्रोन द्वारे 'डार्क स्टोअर्स' मध्ये किराणा सामान पोहोचवणार. येथून स्विगी डिलिव्हरी करणारी व्यक्ती ते पॅकेट उचलून ग्राहका पर्यंत नेऊन देणार. 
 
सध्या $250 दशलक्ष मूल्य असलेले, गरुड एरोस्पेस हे भारतातील सर्वात मौल्यवान ड्रोन स्टार्टअप आहे. 2024 पर्यंत 1,00,000 स्वदेशी मेड इन इंडिया बनवण्याचा एका भव्य योजनेसह ड्रोन आणि ड्रोन तंत्रज्ञान सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 
 
बेंगळुरू मधील गरुड एरोस्पेस आणि दिल्ली -एनसीआर मधील स्काय एअर मोबिलिटी या प्रकल्पावर काम करणार आहे. दुसरा टप्पा ANRA -TECH Eagle Consocia आणि Marut Dronetech Pvt Ltd आणि  marut फेज 1 च्या इनपुटच्या आधारे पुढे जाईल. 
 
या वर्षी फेब्रुवारी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुग्राम आणि चेन्नई येथील मानेसर येथे गरुड एरोस्पेसच्या ड्रोन उत्पादन सुविधांचे उदघाटन केले. गरुड एरोस्पेस किसान ड्रोन यात्रेत देशभरातील 100 गावात एकाच वेळी ड्रोन उड्डाण केले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, 'संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही'