Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीचे भावही कमी झाले

सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीचे भावही कमी झाले
, गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (17:07 IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या स्थानिक सराफा बाजार गुरुवारी सोनं ६४० रूपयांनी घसरल्यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ५४ हजार २६९ रूपयांवर आले आहेत. 
 
एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार गेल्या व्यवसायीक सत्रात सोन्याचे दर ५४ हजार ९०९ रूपयांवर पोहोचले होते. सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरात देखील कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. 
 
दिल्लीत एक किलो चांदीची किंमत ७२ हजार ५६२ रूपयांवरून ६९ हजार ४५० रूपयांवर आली आहे. या काळात चांदीच्या दरांत ३ हजार ११२ रूपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत चांदीचा दर प्रति किलो ६७ हजार १३५ रूपयांवर आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वच्छता सर्वेक्षण -2020 मध्ये पुन्हा इंदूर विजयी, सलग चौथ्यांदा क्रमांक 1 बनला