Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याचा दर सात वर्षातला उच्चांक

सोन्याचा दर सात वर्षातला उच्चांक
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात तब्बल २ टक्क्यांची वाढ झाली असून ते १,६११ डॉलर्स प्रति औंस पोहोचलं आहेत. तर चांदीच्या दरानंही उच्चांक गाठला असून ती १८.८० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचली आहे. सोन्याच्या दरानं गेल्या सात वर्षातील उच्चांक गाठला आहे.
 
घरगुती बाजारपेठेत एका दिवसात १० ग्राम सोन्याच्या दरात ४५० रूपयांची तर गेल्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रूपयांची वाढ झाली आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होत असते. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली घसरणही सोन्याच्या दरवाढीमागील कारण असल्याचं जाणकार सांगतात. चेन्नईमध्ये सोन्याच्या दरानं ४२ हजार ८६०, कोलकात्यात ४१ हजार ७८० तर अहमदाबादमध्ये ४१ हजार ६३०, दिल्लीत ४१ हजार २८० आणि मुंबईत ४१ हजार १५० रूपयांचा टप्पा गाठला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तर' मनसेसोबत युतीचा विचार करु, फडणवीस यांचे भाष्य