Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमं‍त्री

No industry
मुंबई , बुधवार, 8 जानेवारी 2020 (13:52 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगपतींची भेट घेतली. उद्योगांना येणार्‍या सर्व अडचणी व समस्या दूर करणार, तसेच राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी उद्योग क्षेत्रातील प्रमुखांना दिली.
 
राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अनेक बड्या उद्योजकांनी उपस्थिती लावली. रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शहा, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी उद्योगपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस-राज यांची गुप्त भेट; नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?