Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gold Price Today : पाच दिवसांत 3500 रुपये स्वस्त झालं सोनं, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

gold
नवी दिल्ली , मंगळवार, 15 मार्च 2022 (12:15 IST)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे रेट कमी झाल्याने मंगळवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी (Gold-Silver Rate) दर स्वस्त झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव (Gold Price Today) 325 रुपयांनी कमी झाला आहे. मागील पाच दिवसांत सोने दरात 3,500 रुपयांची घसरण झाली आहे.
 
आज MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा वायदे भाव 325 रुपयांची कमी झाला. या घसरणीनंतर सोन्याचा दर 51999 रुपयांवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. आज MCX वर चांदीचा रेटही (Silver Price Today) 561 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज चांदीचा भाव 68,283 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.
 
मागील आठवड्यात सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. परंतु केवळ पाच दिवसांत भाव 3500 रुपयांनी कमी झाला आहे.
 
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा आहे. त्यामुळेच सोने-चांदी दरात ग्लोबल स्तरावर कमजोरी आहे. क्रूड ऑइलचा भावही कमी होऊन 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत आला आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात हळू-हळू तेजी आहे. गुंतवणुकदार सोन्याशिवाय इतर गुंतवणुकीकडे वळले आहेत. या कारणांमुळे सोने-चांदी दर सतत कमी होत असल्याचं चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोर्टाने नवाब मलिक यांची 'ईडी'च्या कारवाई विरोधात केलेली याचिका फेटाळली