Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाडी पार्किंगसाठी गुगल मॅप जागा सांगणार

गाडी पार्किंगसाठी गुगल मॅप जागा सांगणार
गुगल मॅप आता गाडी पार्किंगसाठी जागा आहे की नाही ते देखील सांगणार आहे. गुगलमुळे कोणतीही गोष्ट सहज शोधू शकता आता पार्किंगही तुम्हाला शोधता येणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने एखाद्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा आहे की नाही हे देखील शोधता येणार आहे.

गुगल मॅप्सचे व्ही.9.44 बेटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना ही सुविधा मिळणार आहे. लवकरच सर्व युजर्ससाठी ही ती उपलब्ध होणार आहे. काही ठराविक ठिकाणीच ही सुविधा सुरुवातीला मिळणार आहे. अॅपमध्ये लिमिटेड, मीडियम आणि इझी असे तीन प्रकार आहेत. "पी' या नव्या आयकॉनसमोर हे फ्लॅश होणार असून तेथे पार्किंगसाठी जागा आहे की नाही ते दिसणार आहे.

ही सुविधा मॉल्स, विमानतळ आणि प्रेक्षणीय स्थळांवर उपलब्ध असणार आहे. सोबतच गुगल मॅपवरून तुम्ही उपहारगृह, पेट्रोल पंप, एटीएम, कॉफी शॉप्स, मेडिकल्स, सुपर मार्केट, हॉटेल्स, पब्स आणि बार, डीपार्टमेंट स्टोअर, पोस्ट ऑफिस हे देखील शोधता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जलीकट्टू प्रकरणी हस्तक्षेपास मोदींचा नकार