Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio युजर्ससाठी 4500 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह उत्कृष्ट ऑफर, त्वरा करा

jio fiber
, मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (14:07 IST)
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने जिओ फायबर वापरकर्त्यांसाठी सणासुदीची ऑफर आणली आहे. या अंतर्गत जिओ फायबरच्या ग्राहकांना 4,500 रुपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे. ही ऑफर फक्त त्या यूजर्सना दिली जाईल जे युजर्स 1 ऑक्टोबर ते9 ऑक्टोबर दरम्यान कनेक्शन खरेदी करतील. जिओ फायबर फेस्टिव्ह बोनान्झा जिओच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाला आहे. ही ऑफर फक्त दोन प्लॅनसह उपलब्ध आहे. या योजना रु. 599 आणि रु. 899 साठी उपलब्ध आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी, खरेदीदारांना या दोनपैकी कोणत्याही प्लॅनसह ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागेल. दोन्ही प्लॅन अमर्यादित डेटा ऍक्सेस, कॉलिंग बेनिफिट्स,  फ्री OTT, सबस्क्रिप्शन, फ्री शॉपिंग कूपन आणि इतर फायद्यांसह मिळणार. याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया 
 
Jio Fiber Rs 599 चा प्लान: हा प्लान एक्टीव्ह केल्यावर यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येत आहे. तसेच 30mbps डेटा स्पीड दिला जाईल. हे 3.3TB मासिक डेटा ऑफर करते. यासह, Disney + Hotstar, Sony Liv, Zee5 आणि इतर 12 OTT प्लॅटफॉर्मवर प्रदान केला आहे. याशिवाय, 550+ टीव्ही चॅनेलचे ऑन-डिमांड टीव्ही सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे. या प्लॅनसह, जिओ फायबरच्या नवीन वापरकर्त्यांना 6 महिन्यांच्या वैधतेसह 4500 रुपयांचा लाभ देखील मिळू शकतो.या व्यतिरिक्त इतर खालील फायदे देखील मिळतील. 
 
रिलायन्स डिजिटल वर रु. 1000 सूट
Myntra वर 1000 सूट
Ajio वर रु.1000 सूट
Ixigo वर फ्लॅट रु.1500 सूट
 
Jio Fiber Rs 899 चा प्लान: हा प्लान अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100mbps डेटा स्पीड देतो. हे OTT फायदे देते. ज्यामध्ये Disney + Hotstar, Sony Liv, Zee5 आणि इतर 12 OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. हे 550+ टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेशासह मागणीनुसार टीव्ही सबस्क्रिप्शन देखील देते. यामध्ये नवीन वापरकर्त्यांना 3 महिन्यांच्या वैधतेसह 3500 रुपयांचा लाभही मिळू शकतो. या शिवाय खालील फायदे देखील मिळतात.  
 
रिलायन्स डिजिटल वर रु. 500 सूट
Myntra वर 500 सूट
Ajio वर रु.1000 सूट
Ixigo वर फ्लॅट रु.1500 सूट
 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

T20 विश्वचषक: श्रीलंकेला आज विजयाची गरज, युएईशी सामना