Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विकास दरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण

विकास दरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण
देशाच्या विकास दरात  एप्रिल-जून 2017 या काळात  5.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गेल्या वर्षी याच काळात देशाचा विकास दर 7.9 टक्के एवढा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासदर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे. उत्पादन क्षेत्रात घट झाल्यामुळे विकास दरात मोठी घसरण झाली. तर एप्रिल-जून या काळात सेवा क्षेत्रातील विकास दराचे आकडे समाधानकारक आहेत.
 
देशातील महत्त्वाच्या 8 क्षेत्रांचा विकास दर जुलैमध्ये 2.4 टक्क्यांवर घसरला आहे. एका वर्षापूर्वी याच 8 क्षेत्रांचा विकास दर 3.1 टक्के एवढा होता. अर्थव्यवस्थेच्या या 8 महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास दर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या विकास दरावर पडला. दरम्यान नोटाबंदीमुळे देशाचा विकास दर घटला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’ आणि ‘नोटाबंदी’ पाठ्यपुस्तकांमध्ये