suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुदत ठेवीतून मिळणारे उत्पन्न आयकरच्या रडारवर

income tax

मुदत ठेवीच्या (फिक्स्ड डिपॉझिट) माध्यमातून मोठे उत्पन्न मिळवणारे लोक आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुदत ठेवींच्या माध्यमातून ५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांवर आता आयकर विभागाची नजर असेल. बँकांमधील मुदत ठेवींवरुन व्याज मिळवणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. मुदत ठेवींवर मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती कर भरताना न देणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आयकर विभाग सतर्क झाला आहे. कर भरणाऱ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगर : जि.प. शाळा पडली, तिघांचा मृत्यू