Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीएसटी रिटर्न भरणाऱ्याची 'लेट फी' माफ

जीएसटी रिटर्न भरणाऱ्याची 'लेट फी' माफ
, मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:45 IST)

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी सरकारला परत करणार आहे. अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. मंगळवारी दुपारी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "करदात्यांच्या सोयीसाठी, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या व्यक्तींची लेट फी माफ केले जाईल. करदात्यांच्या लेजरमध्ये ते परत केले जातील.

यापूर्वी, ज्या लोकांनी जीएसटी रिटर्न जुलैच्या शेवटी भरले होते अशा लोकांची जेखील लेट फी सरकारने माफ केली होती. त्याचवेळी सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविली होती. जीएसटी कायद्यानुसार, कर देयकास विलंब केल्यास प्रती दिवस 100 रुपये दंड लागतो. राज्य जीएसटी अंतर्गत देखील अशीच तरतूद करण्यात आली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ताजमहल परिसरात शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न