पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील गृहनिर्माण योजनेतील 5 हजार 69 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत सुरुवात झाली. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 29 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकरनगर येथील कार्यालयात काढली जाणार आहे. 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे.
अर्जदार 10 जून रोजी सकाळी 10 पासून अर्ज करू शकतील. ही वेळ रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करण्यासाठी आहे. 11 जुलै रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. 12 जुलै राजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना अनामत करमेचा भरणा करता येईल.