प्रतीक्षा संपली, अगदी कमी किमतीत लॉन्च झाली Hyundai Venue

बुधवार, 22 मे 2019 (17:01 IST)
Hyundai ने आपली एसयुव्ही Venue लॉन्च केली आहे. Hyundai च्या या कारची लोक उत्सुकतेने वाट पाहत होते. Hyundai Venue बाजारात आल्याबरोबर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट स्पर्धा वाढली आहे. महिंद्राने भारतात आपली स्पोर्टी आणि बोल्ड लुक असलेली एक्सयूव्ही 300 लाँच केली होती. या सेगमेंटमध्ये Hyundai Venue, मारुती सुझुकी वीटारा ब्रेजा, टाटा नेक्सॉन, फोर्ड ईको स्पोर्ट, महिंद्रा एक्सयूव्ही 300, होंडा डब्ल्यूआर-व्हीला टक्कर देणार. फीचर्सनुसार बाजारात याची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. 
 
Hyundai Venue या सेगमेंटमधील पहिली कार आहे जे कनेक्टेड टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीने ब्लूलिंक टेक्नोलॉजी विकसित केली आहे. यात 33 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कनेक्टेड फीचर देण्यात आले आहे. यापैकी, 10 फीचर्स विशेष भारतीय बाजारासाठी तयार केले गेले आहे. भविष्यात कारमध्ये हे फीचर्स पाहिले जाऊ शकतात. 
 
कंपनीच्या मते, Hyundai Venue मध्ये ट्रेंडी, यूनिक, स्टाइलिश आणि पर्फेक्ट डिझाइन दिला गेला आहे. हे Hyundai चे पहिले प्रॉडक्ट आहे जे 7 स्पीड अॅडव्हान्स ड्युअल क्लच ट्रांसमिशन टेक्नॉलॉजीसह सादर केलं गेलं आहे. या कारमध्ये कंपनीने काप्पा 1.0 टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन दिले आहे. यासह 1.2 काप्पा पेट्रोल आणि 1.4 डिझेल इंजिन देखील दिले गेले आहे.
 
कारमध्ये डीआरएल हेडलाम्प दिलं गेलं आहे. मागील बाजूला देखील टेललाम्पमध्ये देखील एलईडी लाइट्स मिळतात. तथापि, हे फीचर फक्त शीर्ष व्हेरिएंट्स मध्येच उपलब्ध आहे. हुंडई वेन्यूची लांबी 3,955 मिमी, रुंदी 1,770 मिमी आणि उंची 1,605 मिमी आहे. कंपनीने 6.50 लाख रुपयांच्या (दिल्ली एक्स शोरूम किंमत) प्रारंभिक किमतीत ही कार लॉन्च केली आहे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख निवडणूक आयोगाकडून विरोधकांना धक्का, शेवटी होणार VVPAT - EVM मोजणी