Mahindra TUV 300 चा अपडेट व्हर्जन लॉन्च, नवीन फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

शनिवार, 4 मे 2019 (17:41 IST)
प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने शुक्रवारी, आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार TUV 300 चा अपडेट व्हर्जन लॉन्च केला. मुंबईतील त्याची किंमत 8.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
 
महिंद्राने सांगितले की 'Bold New TUV 300' च्या डिझाइनमध्ये बदल केले आहे आणि पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल, एक्स-आकाराचे मेटलिक ग्रे व्हील कव्हर सारख्या सुविधा देण्यात आल्या आहे. कंपनी म्हणाली की टीयूव्ही 300 च्या नवीन व्हर्जनमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, जीपीएससह 17.8 सेमी इंफोटेनमेंट सिस्टम, स्टॅटिक बॅन्डिंग हेडलांप आणि मायक्रो-हायब्रीड तंत्रज्ञान दिले गेले आहे. 
 
कंपनीच्या वाहन विभागाचे विक्री व विपणन प्रमुख विजय राम नकारा म्हणाले की एक लाख समाधानी ग्राहकांसह TUV 300 ने स्वतःला कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये स्थापित केले आहे. मला विश्वास आहे की त्याचे नवीन डिझाइन ग्राहकांना आकर्षित करेल.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख LG लॉन्च करत आहे एक स्ट्रॅचेबल स्मार्टफोन