Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारकडून नवीन सुविधा, मिस्ड कॉल करून मिळवा PF माहिती

सरकारकडून नवीन सुविधा, मिस्ड कॉल करून मिळवा PF माहिती
अलीकडेच अर्थ मंत्रालयाचे चालू आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधी व्याज दर वाढवण्याला मंजुरी दिली होती. आता कर्मचारी भविष्य निधी (EPFO) ने कर्मचार्‍यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या माध्यमाने यूएएन पोर्टलवर रजिस्टर्ड कर्मचारी आता केवळ एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे आपल्या पीएफबद्दल सर्व माहिती मिळवू शकतो. जाणून घ्या कशा प्रकारे- 
 
ईपीएफओच्या या नवीन सुविधेचा लाभ उचलण्यासाठी आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरने 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावी लागेल. एवढेच नव्हे तर आपल्याला रजिस्टर्ड मोबाइल नंबरने 7738299899 या वर SMS करून देखील पीएफ खात्याची माहिती मिळू शकते. SMS वर आपल्याला 'EPFOHO UAN' लिहावे लागेल. उल्लेखनीय आहे की ही माहिती ईपीएफओने स्वत: ट्विट करून दिली आहे.
 
कर्मचारी भविष्य निधी संघटनाने आपल्या सदस्यांना चालू आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी डीएफएसने या प्रस्तावाला काही अटींवर मंजुरी दिली आहे. ज्यात रिटायरमेंट फंडच्या कुशल प्रबंधनाची अट देखील सामील आहे.
 
मागील तीन वर्षात व्याज दरात ही पहिली वृद्धी आहे.
 
वर्ष              व्याजदर
2018-19    8.65 टक्के
2017-18    8.55 टक्के
2016-17    8.65 टक्के
2015-16    8.80 टक्के

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सम्राट नारुहितो : प्रवाहाविरुद्ध जाऊन पत्नीला साथ देणारा जपानचा नवा राजा