महाराष्ट्रासह देशभरात परतीच्या पावसाने शेतकऱयांना फार मोठा फटका बसला आहे. या सर्वांचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसतो आहे. यामध्ये पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता आता भाज्यांचा दरात कमालीचे वाढ झाली आहे. मात्र कांद्याच्या दराने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
मुंबईसह आसपासच्या बाजारात प्रती किलो कांद्याच्या दराने तब्ब्ल शंभरी गाठली आहे. तर बटाटा प्रति किलो 50 रुपयांच्या घरात पोहचला आहे.सोबत इतर भाज्यांच्या किंमतीत ही प्रचंड वाढ झाली असून या भाज्यांचे प्रती किलो दर आता 60 ते 200 रुपयांपर्यंत पोहचल्याने सर्वसामान्यांची फार पंचाईत झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात ही दरवाढीची झळ सोसावी लागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबईसह देशभरातील बाजारपेठांमध्ये सध्या ही परिस्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागणार आहे. मुंबईसह देशभरातील बाजारपेठांमध्ये एका दिवसांत कांद्याची किंमत प्रती किलो 60 रुपयांवरुन थेट 100 रुपयांवर पोहचली आहे.त्यामुळे येणार काळ हा कांदा रडवणार आहे.